नको पेन्शन, नको महागाई भत्ता, नको भरमसाठ पगार; बेरोजगार तरुणांना निम्माच पगार द्या, शासन तिजोरी वरील बोजा कमी करा.
देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे
अधिवेशनात बेरोजगार तरुणांसाठी कंञाटी कामगारांचा कायदा करावा, बेरोजगार तरुणांची मागणी.
नोकरशाही वर्गामुळे राज्य सरकार दिवाळखोरीत निघाले तरी चालेल.परंतु पेन्शन कायदा लागू झालाच पाहिजे असा पविञा घेवुन संपात उतरला आहे.जवळपास 18 लाख नोकरदार संपावर गेला असुन संपावर गेलेला कामगार दुसऱ्याचा विचार करीतच नाही.राज्यात आज लाखो तरुण बेरोजगार आहेत.संपावर गेलेल्या नोकदाराच्या निम्मा पगारावर काम करण्यास बेरोजगार तरुण तयार आहे.शासनाने आम्हाला आहे त्या कामगारांच्या पगाराच्या निम्मा पगार देण्यात यावा पेन्शन व महागाई भत्ता,पगार वाढ देवुच नका.त्याचबरोबर कोणतीही शासकीय सुट्टी नको, उलट दररोज दोन तास जादा काम करण्याची तयारी बेरोजगार तरुणांनी दाखवली आहे.शासनाने नोकदारांचे लाड करुन मागण्या मान्य करण्या ऐवजी निम्म्या पगारावर बेरोजगार तरुणांना कामावर घ्यावे. शासनकर्त्यांना वेठीस धरणाऱ्या नोकरशाहीच्या या हट्टाविरोधात बेरोजगार तरुण आंदोलनात उतरणार आहे.यातुन निश्चितच नवा संघर्ष घडणार आहे.असे बेरोजगार तरुणांचे प्रतिनिधी म्हणुन जयेश माळी सांगितले.
देवळाली प्रवरा येथिल बेरोजगार तरुणांनी नोकदार संपाविरोधात तीव्र भावना व्यक्त करुन शासनाचे प्रतिनिधी म्हणुन देवळाली प्रवरा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना निवेदन देवुन बेरोजगार तरुणांना निम्म्या पगारात शासन स्थरावर कंञाटी कामगार म्हणुन घ्यावे अशा मागणीचे निवेदन दिले आहे. माळी पुढे बोलताना म्हणाले की, कोणाचे काहीही होवो, आमच्या पदरात नोकरीत असताना भरभरून द्यावेच लागेल. निवृत्तीनंतरही पिढ्यांची सोय होण्यासाठी पेन्शनही भरभरूनच मिळाली पाहिजे. २००५ पूर्वीचा पेन्शन कायदा लागू करावा, ही मागणी कर्मचारी संघटनांकडून रेटली जात असताना.नोकरदार वर्गाने सर्वसामान्य व्यक्तींना वेठीस धरण्याचा प्रयत्न चालविला आहे.अनेक नोकदारवर्गास प्रमाणापेक्षा जास्त पगार आहे.एका कामगाराच्या पगारात ठेकेदारीवर चार ते पाच कामगार काम करु शकतो. नोकदार वर्गास २००५ पूर्वीचा पेन्शन कायदा लागू करावा ही मागणी कर्मचारी संघटनांकडून पुढे करुन संप पुकारला असुन या संपावर सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुणांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.नोकरदार वर्गास भरमसाठ पगार असतानाही सेवानिवृत्ती नंतर हि पेन्शन मिळाली पाहिजे अशी अग्रहाची भुमिका आहे.
माळी पुढे म्हणाले की,राज्यात 30 लाखा पेक्षा जास्त तरुण बेरोजगार आहेत.तरुणांना रोजगार मिळावा यासाठी धडपड सुरु असते.परंतु रोजगार मिळत नाही.मिळेल त्या पगारात काम करण्याची बेरोजगार तरुणांची तयारी असते.आज शासन 18 लाख कामगारांना जो पगार देत आहे.त्या कामगारांचा निम्मा पगारच बेरोजगार तरुणांना द्या. ते हसत हसत काम करतील आठवड्यातुन एक हि सुट्टी देवू नका, रविवारी सुद्धा बेरोजगार तरुणांची काम करण्याची तयारी आहे.आजच्या नोकरदाराच्या पेक्षा दोन तास दररोज जादा काम करण्याची इच्छा हि तरुण वर्गाने दर्शविली आहे.वयोमर्यादे पर्यंत निम्म्या पगारावर कंञाटी कामगार म्हणून ठेवले तरी चालेल असे बेरोजगार तरुण वर्गाने सांगितले.
सुशिक्षित बेरोजगार असलेली लाखो तरुणाई मिळेल ते काम करून तट्टपुंजा पगारात राबत आहे. त्यांच्या वर्तमानाचा बिकट प्रश्न आहे. शेतकरी-कामगारांच्या अनंत अडचणी आहेत. अशातच ज्यांची जुनी पेन्शन लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर मोठा भुर्दंड पडणार आहे. महिन्याकाठी लाखोंचं वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कशाला हवी जुनी पेन्शन योजना असा प्रश्न उपस्थित करत माळी यांच्यासह बेरोजगार तरुणांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या नोकदार यांच्या विरोधात तीव्र भावना व्यक्त करुन रोश व्यक्त केला आहे.बेरोजगार तरुणांच्या भूत भविष्य आणि वर्तमानाचा मोठा प्रश्न उभा ठाकला असतानाच राज्यभरात शेकडो तरुण युवकयुवती हाताला मिळेल ते काम करून तटपूंजा पगारात चरितार्थ चालवतात. ज्यांच्या वर्तमानाचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघाला अशांनी भविष्याची आस लावून शासनाला वेठीस धरणे अत्यंत चुकीचे आहे. शासनाने आधी सुशिक्षित तरुण युवकांच्या वर्तमानाचा प्रश्न सोडवावा नंतर कर्मचाऱ्यांच्या फालतू अर्थहीन पेन्शनच्या मुद्द्यावर लक्ष द्यावे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न दिवसेंदिवस भयावह रूप धारण करत आहे. छोट्या उद्योगांचा कणा मोडला आहे. अशातच कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे राज्याला मोठ्या आर्थिक भुर्दड पडणार आहे.
शासनाने बेरोजगार तरुणांच्या मागणीवर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.बेरोजगार तरुणांना शासनाकडून कोणतीही पगारवाढ,महागाई भत्ता, घरभाडे,प्रवासभत्ता नको आहे.संपकरी नोकरदारांना जो पगार देताय त्याच्या निम्मा पगार बेरोजगार तरुणांना द्या.शासनाच्या तिजोरीवर पडलेला बोजा बेरोजगार तरुणांमुळे निम्मा वाचणार आहे.शासनाने चालू अधिवेशनातच कंञाटी नोकरदाराचा कायदा करुन बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी द्यावी असे माळी यांनी सांगितले.
यावेळी वसीम शेख,मिराज शेख,संदिप गाडेकर, गणेश इरले,राहुल इंगोले,कुमार भिंगारे, गंगाधर गायकवाड, किशोर पंडीत, नासीर पठाण,शंकर धोञे,गिताराम बर्डे,विशाल बर्डे, प्रसाद गायकवाड,सुरेश पंडीत, संजय संसारे आदी बेरोजगार तरुण उपस्थित होते.