या राज्यापालाला आता जोडे मारायची वेळ आली आहे. – मा.उद्धव ठाकरे साहेब.

मुंबई वर सर्वांचे प्रेम आहे त्यात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईला अत्यंत जपला आहे.
मुंबईला मिळवण्यासाठी मराठी माणसानं सांडलेले रक्त, संयुक्त महाराष्ट्राचा लढा करुन या मुंबईला मिळवलेला आहे. मुंबई बद्दल राज्यपाल हे चुकीचं बोलतात. मुंबईवर प्रत्येक मराठी माणूस प्रेम करतो आणि प्रत्येक मराठी माणसावरती ठाकरे घराणे प्रेम करतात. मग ठाकरे घराणे तरी या वादामध्ये मागे कसा राहील.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना खडे बोल सुनावले. तर ते म्हणतात की राज्यपालांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आलीये, याचा अर्थ कुणी कसा घेईल ते मला माहित नाही. जोडे याचा उपयोग कोण कसा करणार याचीही खात्री नाही.
कोश्यारी यांच भाषण मुंबईतून केलं जातं की, दिल्लीतून लिहून दिलं जातं हे देखील माहित नाही. पुढे ठाकरे म्हणतात महाराष्ट्राचा अपमान करून त्यांनी मराठी माणसाच्या मनात आग लावली. आणि यापूर्वी सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल वक्तव्य केला होता. त्यानंतर आता मराठी माणसाचा अपमान केला.
राज्यपालांचा पदाचा अवमान मला करायचा नाहीये त्या खुर्चीवर बसणारयाचा मान राखायला हवा. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यपालांना घरी पाठवायचा कि तुरुंगात पाठवायचं याबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. हिंदू मध्ये फूट पाडण्याचे काम त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरु केले आहे. महाराष्ट्रात जिथे मीठ खाल्ले तिथे मात्र हरामखोरी केली जाते. असं कडक ठाकरी शैलीत मध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.