अरे बाप रे ! १९ वर्षीय तरुणाने पुण्यात चोरी केली, तब्बल एवढा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. पहा सविस्तर

आज-काल गुन्हेगारी वृत्ती वाढत चालली आहे आणि या गुन्हेगारी वृत्तीमध्ये सोशल मीडिया मोबाईल क्राईम स्टोरी या अशा गोष्टींमुळे क्राईम करण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. क्राईम करणारा हा कुठल्याही एका वयाचा नसून वेगवेगळ्या वयामध्ये गुन्हेगार आपल्याला पाहायला मिळतो, पण सदरच्या बाबतीमध्ये एका तरुणाने चोरी केली आहे आणि त्या चोरी करणाऱ्या तरुणाची वय 19 वर्ष आहे ही घटना पुण्यातून समोर येत आहे याबाबतची अधिक माहिती पाहून…
अक्षय सिंग जुनी वय 19 राहणार वैदुवाडी हडपसर असे या तरुण चोरट्याचे नाव आहे. हडपसर पोलिसांनी या सर्व गुन्हेगाराला जेरबंद केली त्याने घर फोडी चे गुन्हे उघडकीस आले. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्या चोरट्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि सेंट्रो कार असा एकूण बारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला यातली महत्त्वाची आणि विशेष बाब म्हणजे या चोरट्याचं वय अवघे 19 वर्ष आहे हडपसर पोलीस ठाण्यात या चोरट्यावर गुन्हा दाखल आहे.
सुरुवातीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली त्यानंतर हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या चौकशीमध्ये या चोरट्याने आणखी गुन्ह्यांची कबुली दिली तसेच त्याचे जोडीदार जीत सिंग व राजपाल सिंग टाक आणि लकी सिंग यांना देखील अटक केली गेली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर दोन आरोपींना उस्मानाबाद मधून ताब्यात घेतले आहे सदरील तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी त्यांनी चौकशीमध्ये त्यांनी दिलेल्या गुन्ह्याच्या कबुली वरून दिली आहे त्यांच्या ताब्यातून हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरी गेलेल्या तीन गुन्ह्यातील तर बारा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व त्यांनी चोरलेली सेंट्रो कार पोलिसांनी जप्त केली आहे.