अरे बाप रे ! चक्क मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून निघाले, त्यांना थांबवण्यासाठी पहा हे काय केले.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री दौरा करत आहेत यात आरोप प्रत्यारोप चालूच आहेत, अश्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून उठून जायला लागले. लोक निघून जात असल्याचं पाहून गुलाबराव पाटील यांनी त्यांचं भाषण आवरतं घेतलं. भाजप नेते गिरीश महाजनही मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यकर्ते निघून जात असल्यामुळे गिरीश महाजन यांनाही भाषण आवरतं घेतले. गिरीश महाजन यांनीही जात असलेल्या कार्यकर्त्यांना थांबण्याची विनंती केली. आमच्या माता भगिनींना घरी जायचं आहे, त्यांची चलबिचल दिसत आहे. त्यामुळे गुलाबरावांनी भाषण आटोपतं घेतलं, मी पण आटोपतं घेतो, असं गिरीश महाजन त्यांच्या भाषणादरम्यान म्हणाले. प्रमुख नेत्यांनी भाषण आटोपतं घेतल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरूवात केली.
” इथे आणलेली माणसं भाड्याने आणलेली नाहीत. अपक्ष आमदार असतानाही इतका जनसमुदाय आला आहे ” असं एकनाथ शिंदे भाषणाच्या सुरूवातीलाच म्हणाले. अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंनी सभा घेतली. या सभेत त्यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला. त्यावेळेस बोलताना एकनाथ शिंदे यांनी चंद्रकात पाटील यांची कहाणी सांगितली.
चंद्रकांत मला अनेकदा भेटायचा आणि रडायचा, मी ते ऐकून घ्यायचो, कारण ऐकणारा तिथे मी एकटाच होतो. पण आता तुला घाबरायची गरज नाही.कारण हा खरा एकनाथ तुझ्यामागे खंबीरपणे उभा आहे. एका आमदाराला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. आधीचे एकनाथ हात धरून मागे लागले होते, मात्र हा एकनाथ हात धरून चालणारा एकनाथ आहे.’ असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला.