अरे बाप रे ! नववधुचा ” असला ” मेकअपचा व्हिडियो होतोय व्हायरल, तुम्ही एक्कदा पहाच.
मुलींना नट्टा-फट्टा करायला आवडत असतं. प्रत्येक मुलीला वाटतं की, आपण सगळ्यांपेक्षा जास्त सुंदर दिसावं. आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे मेकअपच्या तसेच कपड्यांच्या बऱ्याच गोष्टी ट्राय करत असतात. त्यासाठी ती कपड्यांपासून मेकअप पर्यंत बऱ्याच गोष्टी ट्राय करत असतात. आज काल सोशल मीडियाच्या काळात मेकअप आणि फॅशन या गोष्टी खूप चालतात. लोक विविध प्रयोगही करताना दिसून येतात. सुंदर दिसण्यासाठी, लोकांची लक्ष वेधण्यासाठी मुली हटके स्टाईल करत असतात. त्याचप्रमाणे या स्टाईलचे वेगवेगळे प्रकारे फोटो, व्हिडिओ काढत असतात. आणि सध्या असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
एखादं लग्न असो अथवा एखादा कार्यक्रम कपड्यांपासून तर केसांच्या स्टाईल पर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये मुलींना परफेक्शन पाहिजे असतं. नववधूंच्या मेकअप बद्दल अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण असाच एक तरुणीचा हटके लुक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडिओ मधील मुलीची हेअर स्टाईल आणि दागिने पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल हे नक्की.
सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका मेकअप आर्टिस्टने एका वधूचे केस अशा काही प्रकारे सजवले आहेत की, ते पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. साधारणपणे फुलांचा वापर केसांच्या स्टाईलसाठी केला जातो पण या व्हायरल व्हिडिओमध्ये वधूच्या केसांची स्टाईल चॉकलेट व टॉफी ने करण्यात आली आहे हा व्हिडिओ पाहून कुणालाही विश्वास बसणार नाही.
हा व्हिडिओ मेकअप आर्टिस्ट चित्रा हिने व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती किट कॅट, 5 स्टार, मिल्कीबार आणि फेरेरो रोचर सारख्या चॉकलेट ने वधूचे केस सजवताना दिसत आहे. अगदी मँगो बाईट पासून झुमकेही बनवले आहेत हारही कँडींनी सजवण्यात आला आहे. सदरचा व्हिडिओ आत्तापर्यंत 71 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला असून दोन लाखाहून अधिक लोकांनी त्याला पसंती दाखवली आहे.
या व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट देखील लोकांनी दिले आहेत. अगदी काही कालावधीतच हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. असं काही हटके आणि वेगळं करण्याचा यापूर्वी अनेकांनी प्रयत्न केला आहे त्यांचाही व्हिडिओ असेच धुमाकूळ घालताना आपण सगळ्यांनी पाहिले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा..