अरे बाप रे : तुमच्या घरातल्या दुधात भेसळ तर नाही न ? तब्बल ” एवढा मोठा ” भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त.

सध्या सगळ्याच ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाया चालू आहेत. काही दिवसापूर्वी नाशिक येथील एका खाद्य तेलाची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली होती. त्यामध्ये जवळजवळ एक कोटीच्या वर भेसळयुक्त तेल साठा जप्त करण्यात आला होता. तसेच एक बातमी सध्या समोर येत आहे महाराष्ट्र नंतर आता गुजरात मध्ये एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे.
यामध्ये तब्बल 4000 लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आणि या भेसळ केल्याच्या कारणाने दोघांना अटक करण्यात आली आहे. यामधील धक्कादायक बाब म्हणजे गेल्या चार महिन्यांपासून भेसळयुक्त दुधाचा बाजार सुरू होता. आणि अखेर या सगळ्याचा पडदाफाश करण्यासाठी खाद्य विभागाला यश आला आहे. याआधीही बऱ्याच वेळेस भेसळ युक्त दूध करणाऱ्यांवर कारवाया देखील करण्यात आल्या आहेत मात्र त्यानंतरही भेसळ करणाऱ्यांवर कोणताही वचक बसलेला नसल्याचे या कारवाईच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले. दरम्यान ग्राहकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधावरही अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.
तुम्ही घरात वापरत असलेले दूध भेसळयुक्त तर नाही ना आता अशा शंकाही घेतल्या जातात.
गुजरात मधील राजकोट मध्ये खाद्य विभागाने पोलिसांच्या मदतीने ४ हजार लिटर भेसळयुक्त दूध हे जप्त केला आहे. त्याबरोबरच दोघांना अटक देखील केला आहे यामधील दोघेही एक दुधाचा ट्रक घेऊन जात होते, अशा वेळेस त्यांना रोखून त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या तपासण्याचे दूध टँकर मधील दुधात भेसळ करण्यात आली असल्याचं पोलिसांच्या व अन्न खाते विभागाच्या तपासात निष्पन्न झालं.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ट्रकमधून भेसळयुक्त दुधाची वाहतूक केली जात होती अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार सातारा असून दुधाचा टँकर रोखला व त्याची तपासणी केली तपासणी मध्ये दूध करणाऱ्यांचा भांडाफोड झालाय आता पोलिसांनी या दूध टँकरलाही जप्त केले.
यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशी मधून धक्कादायक माहिती समोर आली. जवळजवळ ४ महिन्यापासून या दुधामध्ये भेसळ केली जात होती असं त्यांनी सांगितलं. सदरील कंपनीमध्ये दुधाची भेसळ करण्यासाठी केमिकल युक्त पदार्थ वापरले जातात अशी माहिती समोर आली आहे. आढळून आलेल्या दुधाचे सॅम्पल चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
सदरील भेसळयुक्त दुधाचे रिपोर्ट आल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असं विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातो.