अरे बाप रे ! अश्लिल डान्स करते म्हणून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना लागणार बंदी ?

गौतम पाटील हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे, गौतमी पाटील चे कार्यक्रम असतील, त्या कार्यक्रमात सादर होणाऱ्या लावण्या असतील, याच कार्यक्रमाच्या दरम्यान होणाऱ्या गदारोळ असेल या सगळ्या गोष्टींमुळे गौतमी पाटील आणि त्यांचे कार्यक्रम हा चर्चेचा विषय ठरत आहेत. गौतम पाटील यांच्या लावण्या सादरीकरणावर ती अनेक कलाकारांनी आक्षेप घेतला होता, याबद्दल पाटील यांनी पत्रकार परिषद घेउन दिलगिरी व्यक्त केली, त्या म्हणाल्या कि कला मांडण्याचा प्रयत्न करत आहे कोणालाही दुखावण्याचा किंवा कलेचा अपमान करण्याचा माझा प्रयत्न नाही ,असं त्यांनी जाहीरपणे म्हटल होत,

पण त्यांच्या कार्यक्रम वाद थांबायचं नाव घेत नाही, आम्हाला अनेक ठिकाणी पाटील यांचे कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी अलोट गर्दी होताना पाहायला मिळते, या सगळ्या गोष्टी वर त्यांनी खुलेआमपणे स्पष्टीकरण दिले आहे , गौतम पाटील यांचे क्रेझ मोठ्या प्रमाणात आहेत,. अनेकदा गौतम पाटील यांचे अनेक गाणे हिट होत आहेत त्यामुळे तरुणांच्या मनावर अधिराज्य करणारे गौतमी पाटील हे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. पाटील यांचा कार्यक्रम होणार का? कार्यक्रम बंद केले जाणार अशा अनेक चर्चा रंगत आहेत.

डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी आणण्याची मागणी केली जात आहे. यावर गौतमीनं स्पष्टीकरण दिलं आहे. काय म्हणाली गौतमी पाहा.मात्रा आता गौतमीच्या कार्यक्रमांवार कायमस्वरूपी बंदी आणा अशी मागणी करण्यात आली आहे.कार्यक्रमांवर बंदी घालण्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देत गौतमी म्हणाली, ‘प्रेक्षकांचं माझ्यावर प्रेम आहे. आज महिला प्रेक्षकवर्गही माझी लावणी पाहायला येतात’.

‘त्यांचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून माझे कार्यक्रम पाहायला येतात. मी एक कलाकार आहे. मी गावोगावी जाते माझी कला सादर करते’.’मागच्या वेळेस माझ्याकडून चूक झाली होती. पण त्यानंतर माझे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत. तरीही अशी मागणी करत असताना मला यावर काही बोलायचं नाही’.’एवढं सगळं छान सुरू असताना, कोणतीही चुक न करताना माझ्या कार्यक्रमांवर अशी बंदी घालणं याचं मला फार वाईट वाटतं’.’माझ्याकडून काही चुकलं तर माझ्यावर अशी बंदी घाला ना. पण मी आता पूर्वीसारखं काही केलेलं नाही. मी आधी चुकले मी मान्य करते’.
