अरे बाप रे ! पुरुषांनी लोणचे खाल्ले तर त्याचे शरीरावर होतात ‘हे’ परिणाम !!
आजकालच्या धावपळीच्या काळामध्ये सर्वांना चविष्ट जेवण पाहिजे असतं ते जेवण बनवणं किंवा खाना खाणे शक्य होत नाही. बऱ्याचदा आपल्या डब्यामध्ये दिलेली भाजीची चव वाढावी म्हणून आपण तळलेल्या मिरच्या, शेंगदाणा चटणी, पापड, लोणची इत्यादींवर ताव मारत असतो आणि आज काल जेवणामध्ये विविध प्रकारच्या चटण्या व लोणची जे खाण्याचे प्रमाण आहे ते वाढलेले आहे. आपण पाहतो की बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोणची बाजारात आलेली आहेत. कुणी बाहेरून विकत लोणची आणतो तर कोणी आपल्या घरातच कैरी आणून त्याचं लोणचं बनवतात. लोणचे नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटते. पण हे लोणचे खाणे हे आपल्या शरीरासाठी चांगले नाही. लोणच्याच जास्त प्रमाण हे आरोग्यासाठी घातक आहे आणि विशेष म्हणजे पुरुषांनी जास्त लोणचे खाणे टाळावे.
बहुदा आपण हे लोणचे फक्त स्नॅक म्हणून नाही तर सकाळचे, दुपारचे अथवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा या लोणच्याचा वापर करत असतो. आणि तसे जर पाहिले तर या लोणच्याने इतर खाद्यपदार्थांची चव वाढते आणि जेवणाबरोबर लोणचे खाल्ल्याने बरेच जण जास्त प्रमाणामध्ये जेवण करतात. यामध्ये जर आपण देखील लोणच्याची शौकीन असाल तर थोडं जपून !
एका न्यूज चैनल ने दिलेल्या बातमीनुसार, लोणच्यामध्ये मिठाचे प्रमाण असते व मिठाचे प्रमाण जास्त असल्याने ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी खूप धोकादायक ठरू शकते. जे लोक जास्त लोणचे खातात त्यांच्यामध्ये गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका वाढू शकतो. व त्याचप्रमाणे हायपर टेन्शन च्या रुग्णांना त्याचा जास्त त्रास होतो.
यामध्ये बऱ्याच जणांना हे देखील माहित नाही की, आपण जे लोणचे बाजारातून विकत आणतो या लोणच्यामध्ये जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात. त्याचप्रमाणे अॅस्टामिप्रिड असतात जे आपल्या मानवी शरीरासाठी हानिकारक असतात. अॅस्टामिप्रिड हे एक प्रकारचे कार्बन आहे आणि हा घटक पुरुषांच्या लैंगिक जीवनात अडथळा निर्माण करू शकतो. यामुळे लोणचे खाताना ठराविक प्रमाणामध्येच लोणचे पुरुषांनी खाल्ले पाहिजे.
तोंडाला चव येण्यासाठी म्हणून आपण जे लोणचे आणतो, हे बाजारातून आणलेले लोणचे जास्त चविष्ट व्हावा म्हणून जास्त प्रमाणामध्ये तेल व जास्त प्रमाणामध्ये मसाले वापरले जातात. त्यामुळे शक्य होईल तेवढे घरगुती लोणचे पण तेही मर्यादित प्रमाणामध्ये खाण्याचा प्रयत्न करत जा. बाहेरचे लोणचे खाल्ले कि त्याचे साईड इफेक्टही होऊ लागतात. आपण बाहेरून विकत आणलेल्या लोणच्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा इतर शारीरिक ज्या समस्या आहेत त्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपल्या तोंडाची चव आणण्यासाठी लोणचे खा पण त्यावर काहीतरी मर्यादा सुद्धा आपण ठेवल्या पाहिजेत. कुठल्याही पदार्थाचे जास्त प्रमाणामध्ये सेवन केले तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसू लागतात. कुठलाही पदार्थ हा जर ठराविक असेल तर त्याने शरीरासाठी काहीही घातक असे होत नाही.