मनोरंजनव्हायरल

बापरे! हॉस्पिटल्समध्ये वॉर्डमध्ये रुग्णांच्या बाजूला उंदरांचा सुळसुळाट.

शहरांमधील मोठ्या रुग्णालयांमध्ये सुविधा आणि व्यवस्थापन काही प्रमाणात चांगलं दिसतं. पण ग्रामीण आणि जिल्हा स्तरावरील सरकारी रुग्णालयांमध्ये आजही स्वच्छता, औषधं, कर्मचारी आणि सुरक्षा यांसारख्या मूलभूत गोष्टींच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातून समोर आला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ गोंडा मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णांच्या वॉर्डचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णाच्या खाटेजवळच उंदीर बिनधास्तपणे फिरताना दिसतात. काही क्षणांसाठी हा दृश्य पाहून हॉस्पिटलमधील स्वच्छता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ एका रुग्णाच्या नातेवाइकाने मोबाईलवर शूट केला आहे. व्हिडीओमध्ये एक रुग्ण खाटेवर विश्रांती घेत असल्याचं दिसतं. त्याच्या अगदी बाजूला ठेवलेल्या स्टीलच्या रॅकवर औषधं आणि जेवणाचे डबे ठेवलेले आहेत. त्याच ठिकाणी उंदीर फिरत असल्यामुळे नातेवाईकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

रुग्णांसाठी ठेवलेलं जेवण डिस्पोजेबल डब्यांमध्ये असलं, तरी उंदरांच्या वर्दळीमुळे ते खाणं सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वॉर्डमध्ये उंदरांची संख्या अधिक असल्याचा आरोपही करण्यात येत असून, यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर सरकार आणि प्रशासनावर टीका सुरू झाली आहे. काही राजकीय पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरत आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. दरम्यान, नेटकऱ्यांनीही संतप्त प्रतिक्रिया देत उपरोधिक कमेंट्स केल्या आहेत.

या प्रकरणामुळे प्रशासनाला चौकशीचे आदेश द्यावे लागल्याचं सांगितलं जात आहे. आता संबंधित हॉस्पिटल प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई केली जाते आणि वॉर्डमधील स्वच्छता व सुरक्षेबाबत कोणती सुधारणा केली जाते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!