लाल निशाण पक्षच्या वतीने शासकीय विश्रामगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख,
शेवगाव, नेवासा, पाथर्डी तालुक्यात पक्षबांधणीसाठी नवीन कार्यकर्त्यांचे संघटन करणे व प्रत्येक गावात पक्षाची शाखा सुरू करणे, नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यामध्ये शेवगाव तालुक्यातील काॅ. जनार्धन नाईक (अण्णा) यांची जेष्ठ मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्यात आले.
तसेच शेवगाव, पाथर्डी,नेवासा प्रसिद्धीप्रमुख म्हणून काॅ. वजीरभाई शेख यांची निवड करण्यात आली, करंजी जि.प.गट प्रमुख म्हणून काॅ. अदिनाथ उमाप यांची निवड करण्यात आली तर याच गटाच्या महिला आघाडी अध्यक्षा म्हणून काॅ. सुनिता उमाप यांची निवड करण्यात आली.
शेतमजूर, शेतकरी, दलित, कामगार यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलनाची दिशा ठरवताना येणाऱ्या काळात शोषित वर्गाच्या प्रश्नांवर आक्रमक शैलीत आंदोलन करून न्याय मिळवून देऊ असा एकमताने निर्णय घेण्यात आला, काॅ. अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अभिवादन सभेच्या नियोजनासाठी सर्व कार्यकर्त्यांनी योगदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या.
या बैठकीस शेवगाव, पाथर्डी, नेवासा येथील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थितीमध्ये काॅ.जनार्धन नाईक (अण्णा), काॅ. निवृत्ती घोडके, काॅ.अॅड.लक्ष्मण बोरूडे, काॅ. दत्ता घोरपडे, काॅ. वजीरभाई शेख, काॅ. सुनिता उमाप, काॅ.अरुण उमाप, काॅ. अदिनाथ उमाप, काॅ. अमोल जगधने, काॅ. गोरक्षनाथ उमाप इत्यादी बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, तालुक्यातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निव्रुत्ती घोडके यांनी केले तर आभार दत्ता घोरपडे यांनी मानले.