राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या वतीने ” सलाम स्वातंत्र्य विरांना ” कार्यक्रम संपन्न.
राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या वतीने अमृत महोत्सव 75 वर्षा निमित्ताने
सलाम स्वातंत्र्य वीराना
या कार्यक्रमाच्या माध्यमातुन
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम दादा कडलग यांच्या आदेशानुसार
राष्ट्रवादी युवा नेतृत्व संदिप गोतरणे यांच्या वतीने,
आज मोहाडी येथील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक सर्जेराव काका देशमुख यांचा सन्मान शाल गुलाब पुष्प आणि देशाचा तिरंगा झंडा देऊन करण्यात आला याप्रसंगी त्यांच्या सौभाग्यवती सौ शीलाबाई देशमुख उपस्थित होत्या. यावेळी सर्जेराव काका यांनी 32 वर्ष व 25 दिवस देशासाठी सेवा केली आपल्याला कार्यानुभव व प्रसंग सांगताना डोळ्यातुन अश्रु आनावर झाले.तसेच सर्जेराव काका यांनी युवा नेतृत्व संदिप गोतरणे यांचे व उपस्थित युवकांचे आभार व्यक्त केले.
तसेच दुसरे भुमीपुत्र सागर विनायक निकम हे आसाम येथे आपल्या भारत मातेच्या सेवेसाठी कार्यरत आहे. आपल्या कष्टातुन पाठलेल्या सागर विनायक निकम यांचे वडिल विनायक यशवंत निकम व मातोश्री सुमन विनायक निकम यांचा देखील सन्मान करण्यात आला. सागरच्या वडीलांनी सांगितले की, आपला मुलगा देशसेवा करतोय देशासाठी लढतोय याचा आम्हाला, पंचक्रोशीतील व महाराष्ट्रला अभिमान वाटतो.
यावेळी फोनवरून महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक पुरूषोत्तम दादा कडलग यांचे आभार व्यक्त केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी युवा नेतृत्व संदीप गोतरणे यांच्या सोबत भाऊसाहेब गणोरे कीरण नाईक ललित देशमुख बाळासाहेब निकम गौरव सोमवंशी संदिप गणोरे सौरव पाटील चेतन पवार गोरख देशमुख बाळासाहेब कराटे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.