रॅपिडो ड्रायव्हरला बघताच तरुणीने केली हद्दच पार; लपून काढला व्हिडिओ अन..

एखाद्या व्यक्तीच्या शरीरावरून रंगावरून रूप उंची वजन यासारख्या गोष्टींवरून हिणवणे तुम्हाला योग्य वाटतं का ?
सगळ्यांना सुंदर दिसायचं असतं पण निसर्गाने जन्माला येताना आपल्याला जे रूप दिल आहे ते सुंदरच आहे परफेक्ट आहे असं समजून जीवन जगायचं असतं. पण काही जण अगदी परफेक्ट दिसावं म्हणून, मेकअप करणे किंवा इतरांपेक्षा आपण जास्त सुंदर कसे दिसू यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच दुसऱ्यांच्या शरीरयष्टीवरून त्यांना हिणवत देखील असतात हे असं करणे योग्य आहे का? तर नाही पण एका व्हायरल व्हिडिओमध्ये अशी गोष्ट घडली आहे. एका रॅपिडो बाईक चालकाच्या शरीर रचनेवरून त्याची थट्टा केल्याचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि यामुळे ज्या महिलेने या बाईक चालकाच्या दिसण्यावरून थट्टा केली आहे त्या महिलेला लोकांच्या नेटकरींच्या प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे.
कमसिमरन कौर नामक एका महिलेने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि तो सध्या मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे त्या महिलेने रॅपिडो बाईक बुक केलेली आहे आणि त्यानंतर रॅपिड ड्रायव्हर तिला घेण्यासाठी तिच्या घराजवळ आलेला आहे. हा वजनाने व शरीराने तंदृस्त असल्यामुळे तिने व्हिडिओ चालू करून त्याची थट्टा करण्यास सुरुवात केली. या ड्रायव्हरचे पोट जास्त दिसत असल्यामुळे त्याचप्रमाणे त्या ड्रायव्हरने पाठीवर लटकवलेल्या बॅगमुळे त्या महिलेला बाईकवर बसायला जागा नसल्याने ती राईड रद्द करणार असते
पण त्याआधी महिला संतापजनक कृत्य करते ज्याने ती सगळीकडे सोशल मीडियावर ट्रोल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आपण पाहिलं तर तिने ड्रायव्हरच्या परमिशनशिवाय व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात करते आणि हसत हसत म्हणते की, ” मी रॅपिडो बाईक राईड बुक केली, पण या ड्रायव्हरला पाहून मी घरातूनच लपून बसत व्हिडिओ बनवत आहे, पण रेकॉर्डिंग पाहून तुम्ही मला सांगा कि बाईकवर मी कुठे बसू ?असे या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते आहे एवढेच नाही तर एवढी थट्टा करून झाल्यावर ती व्हिडिओ तिच्या अकाउंटवर पोस्ट देखील करते.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ instagram अकाउंट ला शेअर करण्यात आला आहे मात्र नेट युजर हा व्हिडिओ पाहून राग व्यक्त करत आहेत आणि त्या पद्धतीच्या कमेंट सुद्धा त्या व्हिडिओ खाली आपल्याला वाचायला मिळतील एखाद्याच्या तब्येतीबाबत बोलणं हे चुकीच आहे एखाद्याच्या शरीरावर बोलण्याचा आपल्याला कोणताही हक्क नाही त्यामुळे काहीही करताना किंवा सोशल मीडियावर टाकताना या गोष्टीचे भान आपण नक्कीच ठेवावं