ऐन लग्नाच्या दिवशीच नवरदेवाचा पाय झाला फ्राक्चर; हे माहित होताच पहा नवरीने काय केले. व्हिडियो व्हायरल.
लग्नाच्या वेळेस अनुचित प्रकार कधी आणि कसा घडेल हे कोणी सांगू शकत नाही. जर संकट येणार असेल तर ते कधीही आणि कुठेही येऊ शकतं. लग्नाआधी वधू वरांच्या घरात अनेक काम चालू असतात. बऱ्याच वेळेस नवरदेवालाच घरातल्या या कामांमध्ये हातभार लावावा लागत असतो. कित्येक वेळेस असंही होतं की लग्ना दरम्यान नवरदेवाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये याचा विचार करून त्याला जास्त कामाचा ताण पडून देत नाही तसेच वराला एकदा हळद लावल्यानंतर तो कुठेही बाहेर पडत नाही आणि अशाच एका नवरदेवाचे व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये वरमाला वेळी नवरदेव आपल्या वधूच्या समोर उभा आहे, पण पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो जास्त वेळ उभा राहू शकत नव्हता मग वधूने असे काही केले कि तिचे सगळ्यांनी कौतुक केले. वरमाला वेळी हटके पद्धतीने विधी पूर्ण केला वाराला उभा करण्याऐवजी तिने वराला सोप्यावर बसवला आणि मग तिने वरमाला घातली
जेव्हा नवरीला वरमाला घालायची वेळ येते तेव्हा वराला उभा न करताच नवरी आपल्या गुडघ्यावर खाली बसते आणि मग सोफ्यावर बसलेला तो नवरदेव तिच्या गळ्यात वरमाला घालतो. त्या विवाह मध्ये नवरी – नवरदेवाचे हे प्रेम पाहून उपस्थित असलेले लोकही भाऊक झाले आणि तसेच हे सर्व पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. नवरीने नवरदेवासाठी जे काही काम केले ते पाहून सगळ्यांनीच तिचे तोंड भरून कौतुक केलं
हा व्हिडिओ tiyasonkar नावाच्या इंस्टाग्राम वरून शेअर केला आहे. आत्तापर्यंत 83 हजार हून अधिक यांनी लाईक केला आहे. तर १२ लाखांहून अधिक हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओवर शेकडो लोकांनी कमेंटही केल्या आहेत. त्यामध्ये एक युजर म्हणतो की, नवरीनं वचन देण्याआधीच पूर्णही केलं. तुम्ही दोघं नेहमी आनंदी राहा. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट यूजर कडन येत होत्या.