ब्रेकिंग : ‘आरे’ वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमींचा पुन्हा एकदा एल्गार !
मुंबई गोरेगाव :
दिनांक ३ जुलै, २०२२
स्थळ: आरे फॉरेस्ट, पिकनिक पॉइंट गार्डन.
संपूर्ण मुंबई शहरातून, १५०० पेक्षा ही जास्त संख्येने मेट्रो कारशेड प्रकल्पाला शांतीपूर्ण निषेध करण्यासाठी मुंबईकर नागरिक उपस्थित झाले. इकडे सामान्यांसोबत राजकारणी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. शिवसेने कडून MP प्रियांका चतुर्वेदी, आप कडून प्रीती शर्मा मेनन आणि आदिवासी समाजाच्या अनेक नेत्यांसोबत प्रकाश भोईर आणि दिनेश हाबले, आशा भोईर सुद्धा उपस्थित होते. आरे वाचवा चळवळीचे स्वयंसेवक बऱ्याच मोठ्या संख्येने हजर होते.
तसेच या वेळी अगदी पहिल्या दिवसापासून या आंदोलनात सहभागी असणारे पर्यावरण प्रेमी शशिकांत सोनवणे
अमृता भट्टाचार्य
प्रमिला भोईर
प्रकाश भोईर
संजय कुंभार
बाबा सागर
उत्तमबाई कांबळे
विजय उत्तमबाई कांबळे यांसह असंख्य पर्यावरणप्रेमी उपस्थिती होते
गट कुठलाही असो, सर्वांची एकच चिंता- आहे नव्याने स्थापित झालेल्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांचा मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग वरून हटवून पुन्हा आरे मध्ये आणण्याचा निर्णय हा दुर्दैवी आहे.
ह्याच्या आधीचा, कांजूरमार्ग साठी निर्णयित झालेला मेट्रो कारशेड प्रकल्प हा केंद्राने मुंबई उच्च न्याालयामध्ये सलग १.५ वर्षे रखडवला. आणि आत्ता तेच १.५ वर्षाच्या रखडलेल्या वेळेचे कारण देऊन आरे चे जंगल पुन्हा छाटन्याचा त्यांचा भाजपा म्हणजेच केंद्राचा निर्णय आहे.
आरेचे आदिवासी जे जंगलात अनेक वर्षांपासून राहत आहेत, जे जंगलाचा हिरवा देव आणि वाघोबा देवतेची पूजा करतात, ते आता चिंतेने ग्रासले आहेत, कारण जंगलासोबत त्यांच्या उपासनेच्या स्वातंत्र्याचा अधिकार आणि त्यांच्या समाजाचे भविष्य देखील धोक्यात आले आहे.
२०१९ मध्ये सर्वोच्य न्यायालयाकडून वृक्ष कत्तलीवर रोख येण्या आधी, MMRCL च्या दाव्यानुसार जवळपास २१५० झाडांची छाटणी झाली, पण हा दावा खोटा असून, आंदोलकांनी रात्रीच्या वेळेस होणाऱ्या वृक्ष कत्तलीला रोखल, तरीही २०० झाडं बळी पडली पण अंगावर खोट्या केसेस ची तमा न बाळगता बाकी सर्व झाडं वाचवली. आजच्या तारखेला, कारशेड प्रकल्पाच्या जागी ४००० हूनही जास्त झाडे निरोगी आणि उंच उभी आहेत.
ह्या सोबतच, देवेंद्र फडणवीस कांजूरमार्ग मेट्रो जमीन घोटाळ्यात सहभागी असून, त्याकरणाने भाजपा सरकारला मेट्रोच्या सार्वजनिक प्रकल्पाला सार्वजनिक जागेचा विरोध करत आहेत.