नगर ब्रेकिंग – पहाटेच्या सुमारास एकाला लोखंडी पाईप, दांडग्याने बेदम मारहाण !
शांत्वन मोतीलाल सगळगिळे यांना पहाटेच्या सुमारास गौरव पाडळे आणि सुनील पाडळे या दोघांनी मिळून लोखंडी पाईप आणि दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणी नंतर सगळगिळे यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तरी ही शांत्वन पोलिसाने नोंद घेतली नाही, उलट शांत्वन सगळगिळे व त्यांच्या मुलावर पाडोळे कुटुंबीयांच्या वतीने आमच्याविरुद्ध खोटे स्वरूपातले गुन्हे दाखल केले.
त्यानंतर आम्ही अनेकदा कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलो, परंतु प्रशासनाने तक्रार नोंदवून घेतली नाही. अधीक्षक साहेबांनी जातीने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, कोतवाली पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा. असे या निवेदनामध्ये म्हटलं आहे.
मात्र पहाटेच्या सुमारास अत्यंत धक्कादायक असा प्रकार घडला त्यामुळे सगळे कुटुंबाचा दहशतीखाली आहे.