कॉंग्रेस

पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीची संघटना आढावा बैठक आज मोहोज देवढे येथे संपन्न.

पाथर्डी प्रतिनिधी वजीर शेख

आज दि,6/6/2023 रोजी पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवणे येथे झाली या बैठकीमध्ये पातळी तालुका काँग्रेस कमिटीची पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीची अधिकृत नवीन कार्यकारणी घोषित करण्यात येऊन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

बैठकीचे सूत्रसंचालन तालुका खजिनदार आदिनाथ देवडे यांनी केले प्रस्ताविक जिल्हा सहसचिव प्राध्यापक जालिंदर काटे सर यांनी केले, यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैया वाबळे , अगोदर जिल्हा काँग्रेस कार्यकारणी चे सुभाष भाबड,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब वाघ ,किसान काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव बडे आदींची भाषणे झाली, आभार सेवा दल काँग्रेसचे तालुका अध्यक्ष किशोर डांगे यांनी मानले.

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष नासिर शहानवाज शेख म्हणाले की पाथर्डी तालुक्यामध्ये काँग्रेसला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन वर्षापासून पदाधिकारी व सहकार यांचे मदतीने आम्ही पक्षाची बांधणी मजबूत करत असून आगामी काळात पक्षाला गतवैभव प्राप्त करून दिली शिवाय स्वस्थ बसणार नाही असा आम्ही विडा उचलत आहोत, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक ज्ञानदेव वाफारे साहेबांनी पक्ष संघटना मजबूत कशी करावी याचे सूक्ष्म मार्गदर्शन केले व पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याचे कौतुक केले,.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी पदाधिकारी आत्तापासूनच सज्ज राहून कामाला लागावे आपण नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती स्वबळावर लढवणार असून काळजी करू नये पाथर्डी तालुका काँग्रेसचे काम अतिशय उल्लेखनीय असून पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही दिली.

याप्रसंगी ओबीसी विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ यांची विशेष उपस्थिती होती व त्यांनी पदाधिकाऱ्यांना मोलाचे व महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले पाथर्डी तालुका कार्य काँग्रेस कार्यकारणी व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी पुढील प्रमाणे-.–

जिल्हा कार्यकारिणीसाठी प्राध्यापक जालिंदर काटे ,श्री सुभाष गहिनीनाथ भाबड, वसंत तुकाराम खेडकर ,नवाब इस्माईलशेख, अमोल भीमराव गाडे, युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीसाठी जुनेद पठाण, शरद पवार किसान सेल जिल्हा कार्यकारिणीसाठी पोपटराव बडे, ग्राहक सेल जिल्हा कार्यकारणीसाठी श्री रोहिदास खेडकर ,सोशल मीडिया काँग्रेसच्या जिल्हा, उपाध्यक्षपदी श्री सुनील पुंडलिक दौंड ,युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारिणीसाठी जुनेद पठाण शरद पवार, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष असलम सय्यद जिल्हा उपाध्यक्ष युसूफ खान जिल्हा सरचिटणीस मोहम्मद शेख,काँग्रेस सेवादल, तालुका अध्यक्ष किशोर डांगे सर तालुका उपाध्यक्ष, अब्दुल अजीज शेख तालुका काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्षश्री गणेश दिनकर, ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष पदावर श्री संजय कराड, ओबीसी सेल जिल्हा कार्यकारणीसाठी सूर्यभान गरजे, पाथर्डी शहर उपाध्यक्ष आकाश काळोखे,युवक काँग्रेस राहुल ढाकणेसोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणीसाठी अशोक ढाकणे, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष पदावर श्री एजाज पठाण ,काँग्रेस तालुका उपाध्यक्ष पदासाठी श्रीरवींद्र पालवे, सुभाष कोलते, फिरोज तांबोळी, प्रशांत मगर ,बाबासाहेब वाघ, गणेश बडे, तालुका संघटक अनिल साबळे ,तालुका खजिनदार आदिनाथ देवढे, तालुका सरचिटणीस वसंतराव पठाडे असलम सय्यद आशिष जायभाय ,आजिनाथ ढोले सुनील दौंड संपत क्षेत्रे तालुका सरचिटणीस या पदावर शशिकांत नवगिरे प्रकाश फुलमाळी गोविंदराव वांढेकर, सागर तरटे, ज्ञानेश्वर भाबड, सेक्रेटरी-शंकरराव जगताप, सह सेक्रेटरी-बबन खेडकर ,सुधीर कराड ,अमोल जाधव ,भारत चितळे, जॉईंट सेक्रेटरी-भारत नारायण देवढे चंद्रकांत ढोले तिसगाव शहराध्यक्ष समीर शेख उपाध्यक्ष रफिक शेख,.

पंचायत समिती गण मंडळ अध्यक्ष पुढीलप्रमाणे-.
अकोले मंडल अध्यक्ष -श्री रविंद्र पालवे, कोरडगाव गड मंडळ अध्यक्ष- जालिंदर काटे सर,करंजी मंडळ अध्यक्ष- संपत क्षेत्रे भालगाव मंडळ अध्यक्ष -आशिष जायभाय तिसगाव मंडळाध्यक्ष- फिरोज तांबोळी टाकळीमानूर मंडळ अध्यक्ष- पोपटराव बडे, माणिकदौंडी मंडलाध्यक्ष- अकबर पटेल करंजी मंडळ कासार पिंपळगाव मंडल अध्यक्ष- भारत चितळे माळी बाबुळगाव मंडळ अध्यक्ष सुभाष कोलते,मिरी मंडल अध्यक्ष- मुसा शेख

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!