नगरमध्ये २ ते ५ नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धाचे आयोजन; देशातील ५१० शाळांचा सहभाग.
नगर नगरमध्ये २ ते ५ नोव्हेंबर या जिमनॅस्टिक कालावधीत सीबीएसई शाळांच्या राष्ट्रीय व क्रीडा प्रकार जिमनॅस्टिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला या राष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. त्यानुसार वाडिया पार्क क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे ही स्पर्धा होत आहे. यात देशभरातील ५१० सीबीएसई शाळांतील २५०० खेळाडू सहभागी झाले आहेत.
१२ खेळाडू सौदी अबुधाबी येथून आले आहेत. मुली अशा स्वतंत्र गटात आणि ११ ते १९ या वयोगटात जिमनॅस्टिक स्पर्धा होत आहेत,नगरमध्ये प्रथमच जिमनॅस्टिकच्या राष्ट्रीय स्पर्धा होत असल्याने स्थानिक खेळाडूंनाही मोठा अनुभव मिळणार आहे. चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलला संस्थापक श्री.संजय जी चव्हाण असून स्कूलच्या प्रिन्सिपल पूजा गुलबक्ष तर सीईओ अशोक सचदेव आहेत.
भारतात वेगाने प्रचलित होत आहेत. अनेक गुणी खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहे. या खेळासाठी लहान वयातच तयारी करणे महत्वाचे असते. त्यामुळे सीबीएसई शाळांमध्ये जिमनॅस्टिकला विशेष प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय स्पर्धेनिमित्त देशभरातील शाळांतील खेळाडू नगर शहरात येणार आहेत. या सर्व खेळाडूंची निवास, भोजन व्यवस्था यजमान म्हणून चित्रकूट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी पंच निरीक्षकही पद ही याच शाळेला देण्यात आले आहे. स्पर्धेनिमित्त देशभरातील विविध राज्यातील खेळाडू नगर शहरात आले आहेत .चित्रकूट इंटरनॅशल स्कूलने यापूर्वी विभागीय ज्युदो, तिरंदाजी स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. त्याची दखल घेत सर्वानुमते राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी या शाळेची निवड झाली.स्पर्धेची सर्व तयारी करण्यात आली असून खेळाडूंना निवासस्थळापासून स्पर्धास्थळी ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय प्रथमोपचार सुविधा, वैद्यकीय पथकही तैनात असणार आहे. नगरकरांनी आवर्जून या स्पर्धेला उपस्थित राहून जिमनॅस्टिक खेळ प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटावा असे आवाहन करण्यात आले आहे.