आमचा 15 ऑगस्ट हा एकच दिवस, नंतर आमच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही, ध्वज बनवणाऱ्यांची खंत.

आमच्याकडे 15 ऑगस्ट हा एकच दिवस, नंतर तुमच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही …
“आमची ओळख फक्त 15 ऑगस्ट पुरतीच, त्यानंतर आम्हाला कोणीही ओळखत नाहीये… अशा भावना आहेत राष्ट्रध्वज विणणाऱ्या महिला कामगार दैवशाला सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या. या 1998 पासून उदगीरच्या मराठवाडा खादी ग्राम उद्योगात काम करतात. सहा दशकापासून राष्ट्रध्वजासाठी लागणारा धागा , कपडा बनवण्याचे काम या ठिकाणी केले जातात.
“देशासाठी आम्ही तिरंगा बनवतो, आमचा तिरंगा लाल किल्ल्यावरती फडकतो याचा मला सार्थ अभिमान आहे, अतिशय आत्मीयतेने आदरयुक्त अस मी हे काम करत असतो पण आम्हाला यातून जो मोबदला मिळतो तो अत्यंत तुटपुंजा आहे. सुरुवातीच्या काळात दीड हजार रुपये पगार पडत होता, आता वीस वर्षे झाले तरी तीन ते चार हजार रुपये पगार पडतो. त्यामुळे उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न पडतो उदगीरच्या खादी केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे उभा राहतो.
दिवसाला दोनशे रुपये एवढी मजुरी मिळते, या मजुरी वरती आमचं भागत नाही असं त्या म्हणतात आम्ही तक्रार कोणाकडे करायची कारण की आमच्याकडे 15 ऑगस्ट हा एकच दिवस असतो. एरवी आमच्याकडे कोणीही ढुंकून पाहत नाही अशी तक्रार या महिला करतात.
या केंद्राचे व्यवस्थापक म्हणतात की, “जर सहा महिन्या आधीच आम्हाला या हर घर तिरंगा योजनेबद्दल ची माहिती दिली असती सरकारनं मोहिमेचे व्यवस्थित नियोजन केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. प्रत्येकाच्या घरावरती खादीचा झेंडा फडकला असता. मात्र तरी देखील या केंद्रातून 24 ते 25 हजार येथे झेंडाची निर्मिती झाली आहे. त्यातून एक कोटी वीस लाख रुपये उत्पादन मिळाले. मात्र जर आधीच नियोजन झाला असता तर निश्चितच प्रत्येकाच्या घरावरती खादीचाच झेंडा फडकला असता. आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे झेंडे फडकवण्याची वेळ भारत वासियांवरती आली नसती.