भगवानगडाहून पंकजा मुंडेंचा ” हा ” आदेश, नाव न घेता भाजपातील ” त्या ” नेत्यावर केली सडकून टीका.
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड येथील दसरा मेळावा पार पडला. भाषणाच्या सुरूवातील पंकजा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणांनी आवाज दणाणून गेला, त्या पुढे म्हणाल्या कि, पोलिसांनी शांततेनं घ्यावं, सगळे जण शांत बसले आहे. समोर बसलेले पाच जण आता शांत बसतील, धिंगाणा करण्याची ही जागा नाही. आज दसरा मेळावा आहे, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मुंडे समर्थक आले आहे. नाशिक, शिर्डी, सिंदखेड राजा, औरंगाबाद सगळ्याच ठिकाणाहून आपण आला आहात. मी देवीकडे मागणी करते की, देवी जसं जन्माला घातलं स्वाभिमानीच्या पोटी, तसं स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे.
यामध्ये पंकजा मुंडे यानी 2024 च्या निवडणुकीची घोषणा करत कार्यकर्त्यांना संबोधित केले. मी अद्यापही संघर्ष सोडला नाही. मुंडे साहेबांना काय संघर्ष नव्हता, प्रवाहाच्या विरोधात कमळाचं फुल घेऊन ते लढले. 40 वर्षांच्या राजकारणामध्ये 4 वर्षांची सत्ता मिळाली. मग माझ्या अंगामध्ये शिवरायांचे संस्कार, मुंडेंचं रक्त आहे. मी कुणाला घाबरत नाही. मी या वचनाला कधीही मुकणार नाही, मी कधीही थांबणार नाही. कधीही झुकणार नाही. पक्ष कोणा एकामुळे मोठा होत नाही. पक्ष हा संघटन कौशल्यामुळे मोठा होत असतो असे म्हणत पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता निशाणा साधला.
पंकजा मुंडे मुख्यमंत्री पाहिजे, अशी घोषणा समर्थकांनी केली, यावर पंकजा म्हणाल्या की, प्रीतमताईंनी सांगितलं की, संघर्ष करो या घोषणा बंद करा, कुणाला संघर्ष आयुष्यात आला नाही. कुणाचे जोडवे उचलणाऱ्याचा इतिहास कधी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या इतिहासात भगवान बाबा हा राष्ट्र संत होऊन गेला, त्यांच्यासमोर आपण सभा घेत आहोत. त्या भगवान बाबांचा भक्त गोपीनाथ मुंडे हा होऊन गेला. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला. त्यामुळे संघर्ष विसरू शकत नाही. युद्धात, तहात वेदना होत असते. कार्यकर्ता, प्रधान मंडळाकडून शिवरायांना संघर्ष सुटला नाही.
पंकजा मुंडे मुख्यमंत्री पाहिजे, अशी घोषणा समर्थकांनी केली, यावर पंकजा म्हणाल्या की, प्रीतमताईंनी सांगितलं की, संघर्ष करो या घोषणा बंद करा, कुणाला संघर्ष आयुष्यात आला नाही. कुणाचे जोडवे उचलणाऱ्याचा इतिहास कधी झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या इतिहासात भगवान बाबा हा राष्ट्र संत होऊन गेला, त्यांच्यासमोर आपण सभा घेत आहोत. त्या भगवान बाबांचा भक्त गोपीनाथ मुंडे हा होऊन गेला. त्यांच्या पोटी मी जन्म घेतला. त्यामुळे संघर्ष विसरू शकत नाही. युद्धात, तहात वेदना होत असते. कार्यकर्ता, प्रधान मंडळाकडून शिवरायांना संघर्ष सुटला नाही. तुम्ही सोबत आहात उद्याचा सूर्य आपलाच आहे.