शिक्षणासाठी आईने दागिने गहाण ठेवले, आणि आज तोच मुलगा प्रशासनात मोठा अधिकारी ! पहा सविस्तर.
प्रत्येक आई-वडिलांचे एक स्वप्न असते, आपल्या मुलांना शिकावं आणि उंच भरारी घ्यावी असं वाटतं आणि यासाठी आई-वडील सर्वतोपरी प्रयत्न करतात. कधी त्यांना आपले डाग दागिने विकावे लागतात कधी जमिनी विकावे लागतात तर कधी कोणत्याही गोष्टी करून आपल्या मुलांना शिक्षण द्यावं लागतं. आणि हीच मुलं या सगळ्याची जान ठेवून आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात.
”सिद्धत से तुम चाहो तो कयामत भी झुकती है” असे फिल्मी डायलॉग आपण बऱ्याचदा प्रेमात मारतो. मात्र करिअर वरती प्रेम करताना जर अशाच पद्धतीने मेहनत केली तर नशीब सुद्धा झुकतं हेच या पठ्ठ्याने खरं करून दाखवलं, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून, गरीब शेतकरी कुटुंबातील पांडुरंग गोरख चोरमले यांच्या यशातून दिसून येतो.
बारावीनंतर पुणे येथून धातुशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात पैशाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासत होती. त्यामुळे वडिलांनी व्याजाने कर्ज काढले. तर आईने स्वतःचे सोने गहाण ठेवून पदवीच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत कसलीही कमतरता भासू दिली नाही. याकाळातच शिक्षणासाठी काही जमीन देखील विकली. परंतु आपल्या मुलाने चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती.
त्यांच्या कष्टामुळेच आपण शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यांनी अनेक हालअपेष्ठा सोसत शिक्षणासाठी पैसे उभा केले. घरच्या या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिद्द व चिकाटीने अभ्यास करत चांगल्या गुणांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लगेच नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची व पदाची नोकरी मिळाली. आईवडिलांचे कष्ट सार्थकी लागले होते. पगारातुन आलेल्या पैशातून घरची परिस्थिती देखील थोडीफार सुधारली होती. याकाळात लग्नही झाले. परंतु नोकरीच्या काळात स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळाली व आपण अधिकारी होऊ शकतो असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे कंपनीकडून विदेशात नोकरीची सुवर्णसंधी असताना देखील न जाता. नोकरी करत स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला.
एकीकडे स्पर्धा परीक्षेत यश नव्हते, हातात नोकरी नव्हती, वय वाढत चालले होते, समाजात बोलणे खावे लागायचे. अशा स्थितीत कुटुंबीय व मित्रपरिवारने पूर्णपणे पाठिंबा दिला. जवळपास यूपीएससीच्या सलग चार अपयशानंतर पाठीमागील चुका सुधारत एक नव्या उमेदीने व जोशाने परिक्षेला सामोरे गेलो अन् वयाच्या 32 व्या वर्षी, पाचव्या प्रयत्नात यूपीएससीतुन भारतीय डाकसेवा अधिकारी (IPOS) म्हणून निवड झाली. सध्या कोलकत्ता येथे कार्यरत आहे.
प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना शिकावं आणि उंच भरारी घ्यावी असं वाटतं आणि यासाठी आई-वडील सर्वतोपरे परी प्रयत्न करतात कधी त्यांना आपले डाग दागिने विकावे लागतात कधी जमिनी विकावे लागतात तर कधी कोणत्याही गोष्टी करून आपल्या मुलांना शिक्षण द्यावं लागतं आणि हीच मुलं जी जाण ठेवतात आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करतात.
या यशाबद्दल पांडुरंग सांगतात की, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, अल्पभूधारक शेतकरी कुटुंब. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. आई-वडिल दोघेही अशिक्षित जरी असले तरी शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होते. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आमची वस्ती होती. तिथेच उघड्यावर एका झाडाखाली पहिली ते चौथीपर्यंत शाळा भरायची. नंतर माध्यमिक शिक्षण गावातील वामनराव बदे विद्यालयातुन पुर्ण केले. लहानपणापासून हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात असल्याने, आत्मविश्वास आणखी वाढायाचा. अभ्यासाबरोबरच घरची जनावरे राखणे, इतर कामात आई-वडिलांना मदत करून गुणवत्तेचा आलेख प्रगतीपथावर असायचा. त्यामुळे आई वडिलांना आनंद तर होत असायचा. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील अकरावी बारावीसाठी बारामती येथील महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्यात आला. शिक्षणासाठी अधिक खर्च वाढल्याने, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. त्यामुळेच आपले घरची परिस्थिती बदलण्यासाठी पांडुरंग यांनी जिद्द आणि चिकाटीने अभ्यास सुरू केला त्यांना यामध्ये यश मिळालं नशिबाला ही त्यांच्यापुढे झुकाव लागलं आणि ते स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होत एका उच्च पदावरती विराजमान झाले.