पारनेरचा आरोपी विजय औटीला जिल्हा रुग्णालयात मिळत होती VVIP ट्रीटमेंट, स्वतःच्या लेकराप्रमाणे आरोपीचे लाड.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पारनेर येथील आरोपी विजय सदाशिव औटी हा २ तारखेपासून नगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी ऍडमिट केला होता रिपोर्ट नुसार त्याला पोटदुखीचा त्रास होता त्यासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय पारनेर यांनी नगर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवले होते
रिपोर्ट पाहिले असता त्याच्यावर ट्रीटमेंट होणे गरजेचे होते पण त्यासोबत त्याने एक लेखी दिले होते कि ” मी कोणतेही गोळ्या औषध घेणार नाही मला जर काही जीवाला धोका झाला तर यामध्ये जिल्हा रुग्णालयाचे कोणीही दोषी तासात ” त्याने सांगितलेल्या प्रमाणे टेस्ट केले असता सर्व रिपोर्ट क्लिअर होते पण तरी देखील त्याला जिल्हा रुग्णालय येथे ४ दिवस ठेवण्यात आले
ज्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहे अश्या आरोपीला वेगळी AC रूम देखील देण्यात आली समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओ फोटो वरून त्याला VIP ट्रीटमेंट देण्यात आली होती. एका फोटोमध्ये तो फोनवर बोलत असताना सुद्धा समोर आले होते तसेच दिवसभर त्याला भेटण्यासाठी लोकांची येजा चालूच होती एक आरोपी असून सुद्धा त्याला एवढी सूट का दिली ? तसेच त्याच्या पाठीशी कुणाचा हात आहे ? असे बरेच प्रश्न लोकांमध्ये उपस्थित होऊ लागले
याबाबतची माहिती महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कळाल्यावर त्यांनी नगर जिल्हा रुग्णालय गाठले सायंकाळी 08.00 वाजता जिल्हा रुग्णालय या ठिकाणी किरण काळे तसेच प्रकाश पोटे व बाकी कार्यकर्ते यांनी याठिकाणी आंदोलन मांडली व या आरोपीच्या बाबतची माहिती आम्हाला द्या नाहीतर आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही असे त्यांनी तेथील सीएमओ यांच्याकडे मागणी केली आठ वाजता मागणी केली असता त्यातील तेथील सीएमओने सांगितले की त्या आरोपीला सकाळीच डिस्चार्ज दिला आहे
असे ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांना धक्का बसला व कार्यकर्त्यांनी त्याचे डिस्चार्ज पेपर दाखवा अशी मागणी केली पण त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी C.M.O. हे देऊ शकला नाही त्यानंतर ज्या रूममध्ये त्या आरोपीला ठेवण्यात आले होते त्या ठिकाणी गेल्यावर तेथील महिला कर्मचारीने सांगितले की त्याला सायंकाळी 08.13 मिनिटांनी सोडले आहे
म्हणजेच जिल्हा रुग्णालयातील C.M.O. आणि तेथील महिला कर्मचारी यांच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसून आली आणि त्यामुळे या प्रकरणांमध्ये असलेल्या संशय आणखी वाढू लागला याबाबतची सखोल चौकशी केली असता तो 08.13 मि.ला जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून निघून गेला आणि थोड्या वेळानंतर पारनेर येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी आरोपी सदाशिव औटी 09.05 मि ने दाखल झाला म्हणजेच जर C.M.O. च्या म्हणण्यानुसार तो सकाळी डिस्चार्ज झाला तर मग दिवसभर कुठे होता ? चार दिवस त्याला रुग्णालयात का ठेवले ? चार दिवसांमध्ये त्याला काय काय ट्रीटमेंट दिल्या ? त्याच्याकडे चार दिवस लोकांची ये जा चालू होती तर का येत जात होते ? याबाबतचे सगळे पुरावे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मागितले आहे