नगरच्या नेहलने लावला अटकेपार झेंडा, न्युमोनिया ग्रस्तांसाठी पहा तिने काय केले.
गेल्या काही वर्षापासून आरोग्याच महत्व वाढले आहे, प्रत्येकजण कोणता ही आजार होऊ नये यासाठी वेळीच काळजी घेतात. सार्वजनिक ठिकाणी फिरताना विशेष काळजी घेण महत्वाच आहे कारण काही आजार हे संसर्गजन्य असतात. एका पासून दुसऱ्याला होतात. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वायू प्रदूषणामुळे न्यूमोनियाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
छोटा असणारा मात्र तेवढाच घातक असा न्यूमोनिया चा आजार प्राणघातक आहे त्या पासून सुरक्षा मिळावी यासाठी नगरच्या इयत्ता बारावीत शिकणाऱ्या नेहल जोशीने न्यूमो फ्री मास्क सिस्टीम तयार केली आहे, या आजारापासून पूर्ण सुरक्षा देणारी ही एक अशी मास्क सिस्टीम आहे जी शुद्ध ऑक्सिजन सपोर्ट देते. फुफ्फुसे इनहेलर सिस्टीम द्वारे निरोगी ठेवते व न्यूमोनियाच्या जीवाणूंपासून बचाव करते.
ही सिस्टीम पर्यावरणपूरक तसेच सौर ऊर्जेवर आधारित आहे. नेहलच्या या संशोधन अनेक डॉक्टरांचे प्रमाणपत्र मिळाले असून याला विविध राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या बरोबरच नेहलची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड येथे नोंद झालेली आहे. देशातील नामांकित जागरण जोश बेस्ट युझ ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ह्या ॲवॉर्डने नेहलचा दिल्ली येथे सन्मान झालेला आहे. सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत नेहलने जागतिक स्तरावर ४४ वा क्रमांक पटकावला.
सिल्व्हरझोन इंटरनॅशनल सायन्स ऑलिंपियाड मध्ये नेहलने केमिस्ट्री व बायोलाॅजी या विषयात परफेक्ट स्कोअर करत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले. यासोबतच नेहलला महाराष्ट्राचा आदर्श युवा विज्ञान रत्न पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. दयानंद सागर बेंगळुरू युनिव्हर्सिटीचा राष्ट्रीय स्तरावर इनोव्हेशन अवाॅर्ड प्राप्त झाला आहे. न्यूमोनिया हा फुफ्फुसाचा एक सामान्य संसर्ग आहे, जो जीवाणू किंवा विषाणूमुळे होऊ शकतो. न्यूमोनिया हा एक अतिशय सामान्य आजार आहे, परंतु त्याची काळजी न घेतल्यास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.
न्यूमोनियास कारणीभूत ठरणारे बॅक्टेरिया, व्हायरस हे संसर्गजन्य असतात. त्यामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत न्यूमोनिया पसरू शकतो. न्यूमोनिया रुग्णाच्या खोकला व शिंकेद्वारे बॅक्टेरिया किंवा व्हायरस दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरत, न्यूमोनिया हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा श्वसन संक्रमण आहे,ज्यामुळे एक किंवा दोन्ही फुफ्फुसांच्या हवेच्या पिशव्या सूजतात. हवेच्या पिशव्या द्रवाने भरतात, ज्यामुळे कफ किंवा पू सह खोकला, ताप, थंडी वाजून येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ‘न्युमोनिया’वर उपचार करताना योग्य उपचार केले नाहीत तर ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व्यक्तीचा मृत्यू ओढवतो. अशा वेळी नेहल ने बनवलेले न्यूमो फ्री मास्क सिस्टीम उपयुक्त ठरू शकते.