जालन्यातील पोलिसाने बायकोला त्याच्याच वरिष्ठांसोबत रंगेहात पकडले,पहा जालन्यातील प्रकार सविस्तर.
कधी काय घडेल याचा काही नेम नसतो, अत्यंत धक्कादायक अशी बातमी जालन्यातून पुढे येत आहे. पोलिस शिपाई या पदावरती कार्य करणार्या व्यक्तीशी निगडित असणारी ही बातमी आहे. पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या पत्नीचे त्याच्याच पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक दावा केला. मी स्वतः त्यांना नको अवस्थेत पाहिलं आहे. त्यांना रंगेहात पकडल असं सांगणारा व्हिडीओ क्लिप पोलिसांनी वायरल केला आहे. या व्हिडिओत तो पोलीस म्हणत आहे. पोलिस अधिकाऱ्याची बायको आपली बायकोची खास मैत्रीण आहेत असही तो यात सांगतोय.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून जालना जिल्ह्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप मुळे चांगलीच खळबळ माजली आहे. या क्लिपद्वारे संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्याच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याचे व आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे त्यामध्ये भाष्य केले. त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर तो अधिकारी पळून गेला तर पत्नी माहेरी निघून गेली असं पोलिसानी सांगितलं. हा व्हिडिओ जालना पोलीस दलाला काळ फासणारा व्हिडिओ आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे जालना जिल्ह्याच्या पोलीस दलातील हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
मी बायको आणि माझ्या साहेबांना नको त्या अवस्थेत पाहिलं, साहेब पळून गेले माझ्या खोलीतून, बायको घाईघाईने धावत गेली आणि कंडोम टॉयलेटमध्ये फेकला, मी हात घालून कंडोम बाहेर काढला, बायको अजूनी माहेरी आहे, मी तिला खूप कन्व्हिन्स केलं, पाया पडलो, तुला परत नांदवतो, असं सांगितलं. व्हायची ती बदनामी झालीच, असं पोलीस व्हिडिओत म्हणतो. ज्याने चुकीचं केलं, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, मी आणि माझी मुलं उघड्यावर आलो, मला न्याय द्या, तिच्यावर गुन्हा दाखल करा, अशी विनंती पोलीस करतोय.
अधिकाऱ्याची बायको आणि आपली बायको या खास मैत्रिणी असून त्या अधिकाऱ्याच्या बायकोने देखील आपल्या बायकोला पैसे देण्याचे आमिष दाखविले आहे असे या क्लिपमध्ये उल्लेख आहे.सदरील पोलिस अधिकाऱ्याचा दरारा चांगला आहे आणि देवधर्माच्या मार्गावर असणाऱ्या या अधिकाऱ्याला कीर्तनकार म्हणूनही ओळखतात. त्यामुळे या प्रकरणातील व्हिडिओ-ऑडियो क्लिपने जिल्हाभरात खळबळ उडविली आहे.