गुन्हेगारी
अहमदनगर शहरातील कोठला परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा..

अहमदनगर शहरात आपण पहिले आहे कि बरेच अवैध धंदे चालू आहेत, आयातच पोलिसांनी कोठला बस स्थानक येथील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलीस पथकाने बुधवारी सायंकाळी कारवाई केली.
या कारवाई मध्ये जवळजवळ 19 जुगारी पकडण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई दरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा 27 हजार 720 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यात हद्दीत ही कारवाई करण्यात आली.