पोलिसांना मिळाली गोपनीय माहिती; सिनेस्टाइल केला पाठलाग, गाडी उघडताच दिसलं अस काही..
धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, रोहीणी भोईटी गावाकडुन शिरपुरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार नंबर MH १३ BJ ९००१ मध्ये चार इसम गावठी कट्टे घेवुन जात आहेत. त्यानुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी लागलीच पथकाला आदेश देऊन कारवाईची सूचना केली
गावाकडे जात असताना पथकाला समोरुन संशयित कार येताना दिसली. त्यास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन न थांबवता शिरपुरच्या दिशेने वेगाने कार पळवली. या कारचा सिने स्टाईल पाठलाग करून तिस चिलारे गावाजवळ थांबविण्यात आले.
गाडीत बसलेल्या इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोसई भिकाजी पाटील व पोसई संदीप पाटील यांनी चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे राहुल विष्णु शिंदे , अमोल रविंद्र कोरडे,ओमकार गणेश स्नदिवे, सुरज महताब शेख, यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी ही केली धडाकेबाज कारवाई
एका कारमधून होणारी गावठी पिस्टल व काडतुसांची तस्करी रोखण्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून चिलारे गावाजवळ या कारला थांबवून चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टलसह चार जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिरपूर तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतुक केले.