जरंडी येथील प्राथ. आरोग्य केंद्रास मु. का. अधिकारी यांची भेट, डॉ.निलेश गटणे यांनी केले वृक्षारोपण.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव दि.२३…सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे दि.२० बुधवार रोजी औरंगाबाद जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश गटणे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी जरंडी ग्रामपंचायतद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे आपल्या हस्ते उद्घाटन केले व वृक्षारोपण केले यावेळी त्यांनी ग्रामपंचायतचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले त्यानंतर त्यांनी येथील केंद्रीय प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य केंद्राच्या परिसरात आपल्या हस्ते वृक्षारोपण केले व कोरोना काळात केलेल्या आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा स्वयंवसेविका यांचे कौतुक केले व कोरोना अजून पूर्णपणे गेला नसून कोविड लसीकरणावर भर देण्यास सांगितले
यावेळी प्रकाश नाईक गटविकास अधिकारी पंचायत समिती सोयगाव, रमेश शिंदे उपविभागीय अभियंता पाणीपुरवठा,प्रकल्प अधिकारी दीपक म्हेत्रे यांची उपस्थिती होती तर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव, औषध निर्माण अधिकारी हर्शल विसपुते, आरोग्य सहायक अनिल जोहरे, आरोग्य सेवक श्रीराम चव्हाण, ईश्वर निकम, सागर घायवट, आरोग्य सहायिका श्रीमती सांगोळेताई, आरोग्य सेविका, श्रीमती कल्पना डांगरे,अशा स्वयंसेविका शुभांगी पाटील, मंगळाबाई बिर्हारे,गटप्रवर्तक प्रज्ञा मोरे आशा स्वयंसेविका रेखा महाजन ,फराह देशमुख, नाजोबाई चव्हाण सफाई कर्मचारी, राहुल दांडगे, संदीप तेलंग हे व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते