प्रा. सत्येंद्र राऊत तर्फे महाविद्यालयास 52 पुस्तकें भेट.
अणदूर ………..
येथील जवाहर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय व सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन व प्रेरणा दिनी जवाहर महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख प्रा डॉ. सत्येंद्र राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बी. ए. बी. एस्सी व बी. काॅम द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले
स्वलिखित गीर्वाणमंजरी 51 प्रती व जागतिक रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झालेले प्रेम काव्यसंग्रह असे एकूण तीन हजार किंमतीचे 52 ग्रंथ जवाहर महाविद्यालयास भेट दिली. प्रा. राऊत यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्यात खूप मोठे योगदान असून एकूण चार पुस्तके अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत म्हणून महाविद्यालयाच्यावतीने राऊत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नंतर कु. कशीश बंदपट्टे, अनुजा जगदाळे, निकिता धोत्रे, शिल्पा घोडके, नम्रता कबाडे, वैष्णवी राठोड, अस्मिता हजारे, वैष्णवी गुड्ड,गायत्री माने, करण गोस्वामी, ओंकार पाटू यांनी संस्कृत व इतर विविध ग्रंथातील विचारांचे वाचन केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य डॉ. मल्लीनाथ लंगडे सरांनी अतिशय मार्मिक भाषेत मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांनी जगणं सुंदर करायचं असेल तर चांगल्या सवयी जपा,
दर्जेदार पुस्तकांचे वाचन करा, महान् नेते कसे घडले हे जाणून घ्या, जीवनाला चांगला आकार द्या, वाचन करण्याची कला जोपासा, महापुरुषांचे जीवन चरित्र वाचत रहा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचलन डॉ.सूर्यकांत आगलावे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मल्लीनाथ बिराजदार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ग्रंथपाल शैलेश शाइवाले यांनी केले असून या कार्यक्रमानिमित्त अनेक प्राध्यापक बंधुभगिनी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.