स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम अंतर्गत अजिंठा येथे महिला बालविभागामार्फत जनजागृती..
विजय चौधरी-औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उपक्रम अंतर्गत “हर घर तिरंगा” या अनुषंगाने अजिंठा येथे महिला बालविभागामार्फत जनजागृती साठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे सामूहिक राष्ट्रगीत, प्रभातफेरी,चित्रकला स्पर्धा,महिला मेळावा, मोबाईलचे दुष्परिणाम, गोपाळपंगत,वृक्षारोपण, किशोरी मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम इ.कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात येत आहे दि.११ गुरुवार रोजी अजिंठा ग्रामपंचायतच्या वतीने सर्व अंगणवाडी सेविकांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले तसेच अंगणवाडी सेविका यांनी घरोघरी तिरंगा झेंडा मिळावा म्हणून आपल्या आपल्या कार्यक्षेत्रात माहिती दिली व ग्रामपंचायतीला सहकार्य केले तसेच यावेळी ग्रामसेवक दत्तात्रय सिरसाठ व महिला बाल विभाग पर्यवेक्षिका वैशाली पाटील यांनी महिला मेळावा घेऊन “झेंडा” कसा लावावा याविषयी मार्गदर्शन केले यावेळी अंगणवाडी सेविका यांची उपस्थिती होती