जरंडीला घंटागाडीचे लोकार्पण…..पाच लक्ष रु.ची संगीत मय घंटागाडी…

विजय चौधरी-औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
जरंडी ता. सोयगाव येथे स्वराज्य महोत्सव,आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जरंडी ग्राम पंचायतीची घंटागाडीचे गुरुवारी तहसीलदार रमेश जसवंत,गटविकास अधिकारी प्रकाश नाईक,सरपंच वंदनाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांच्या सहकार्याने गावाचा कायापालट करण्यात मजल मारली असून गाव व परिसर स्वच्छतेकडे घेऊन जाण्यासाठी जरंडी ग्रामपंचायतने आगेकूच केली आहे.
गुरुवारी स्वराज्य महोत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात गावातील केर कचरा गावाबाहेर वाहून नेण्यासाठी संगीत मय घंटागाडीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी तहसीलदार रमेश जसवंत, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, पोलीस निरीक्षक अनमोल केदार,सरपंच वंदनाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील,दिलीप पाटील,अमृत राठोड,माजी पंचायत समिती सदस्य संजीवन सोनवणे, ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे, आदी सह ग्रामस्थांची उपस्थित होती.