मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरेंचा फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न, VIDEO होतोय व्हायरल.
मराठा क्रांती मोर्चाचे रमेश केरेंचा फेसबुक लाईव्ह करून धक्कादायक माहिती दिली , भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या .
काही दिवसांपूर्वी मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी फेसबुक लाईव्ह करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या व्हिडीओमुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रमेश केरे यांनी तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले आहे.
रमेश केरे यांनी आज फेसबुकवर लाईव्ह येऊन आपण आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले.गेल्या काही दिवसांमध्ये आपल्यावर चुकीचे आरोप झाले. त्यामुळे माझी नाहक बदनामी केली आहे. भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याजवळच्या माणसांनी मला त्रास दिला असा आरोप करत केरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला.
फेसबुक लाइव्हमध्ये केरे म्हणत होते की ‘जय जिजा,ऊ जय शिवराय शेवटचा, असं म्हणत मला माफ करा म्हणत आरक्षणाच्या मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांसाठी मी प्रामाणिकपणे काम करत आलोय मात्र बदनाम केलं म्हणून मी अस करतो.. म्हणत भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या या व्हिडीओमुळे मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रमेश केरे यांनी तातडीने जेजे रुग्णालयात दाखल केले आहे.