मनोरंजन

” तुझ्यात जीव रंगला ” फेम राणादा व पाठक बाई पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

घराघरांमध्ये टीव्ही मालिकांचे एपिसोड सुरू असतात. घरातील प्रत्येक माणसाची एक वेगळी मालिका असते त्यात सर्वाधिक झी टीव्ही च्या मालिकांना पसंती देखील दिली जाते. काही वर्षांपूर्वी एक मालिका आली होती आणि ती अत्यंत गाजली होती त्यामधील दोघेही पती-पत्नी हे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावरती अधीराज्य करत होते. या मालिकेचे नाव होते तुझ्यात जीव रंगला सर्वसामान्य कोल्हापूरचे कुटुंब या सिरीयल मध्ये दाखवलं होतं. त्यामध्ये एक उच्चशिक्षित असणारी शिक्षिका पाठक बाई या सिरीयलची अभिनेत्री होती. आणि कोल्हापूरचा पैलवान म्हणजेच रानदा.

पाठक बाई आणि राणादा यांचेही केमिस्ट्री संपूर्ण महाराष्ट्रात पॉप्युलर झाली. अभिनेत्री अक्षया देवधर व अभिनेता हार्दिक जोशी हे दोघेजण आपल्या खऱ्या आयुष्यात देखील एकमेकांचे पती-पत्नी म्हणून विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र या दोघांचा नवीन कोरा करकरीत असा एक सिनेमा येतोय. यामध्ये हे दोघेजण सोबत काम करतात या दोघांची केमिस्ट्री असणार आहे. सध्या ते लंडनमध्ये आहेत असे सोशल मीडिया वरती चर्चा सुरू आहे. सिनेमाचं नाव ‘ फाईल नंबर 498 अ ‘ असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. अक्षया आणि हार्दिक यांची जोडी तुझ्यात जीव रंगला यानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतीय.

हार्दिक आणि अक्षय यांच्या जोडीने प्रेक्षकांना तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षरशः वेड लावलं होतं. या मालिकेने कमी कालावधीमध्ये खूप लोकप्रियता मिळवली होती. अक्षया म्हणजे अंजली बाई आणि हार्दिक म्हणजे राणादा या जोडीचा चहाचा वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच काही महिन्यापूर्वी ऑन स्क्रीन दिसणारी हि जोडी खऱ्या आयुष्यात सुद्धा साखरपुडा केल्याचे जाहीर केला आहे.

या सुंदर अशा जोडीला एका सिनेमामध्ये पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. एका मालिकेतील पात्रांवर त्यांनी चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळवले आणि आता सिनेमांमध्ये सुद्धा एकत्र काम करून चाहते वर्गांना नक्कीच चाहत्यांचा समाधान होणार आहे. यांचे एकमेकांसोबत असलेले जे स्पेशल नातं आहे ते यांनी सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर ही जोडी सध्या एकमेकांसोबत बराच वेळ घालताना आपण पाहत आहोत. त्यांचे एकमेका सोबतचे घालवलेले काही क्षण हे त्यांनी सोशल मीडियावर सुद्धा शेअर केले आहेत. हि जोडी लंडनमध्ये असल्याचे सुद्धा दिसून येत आहे. या दोघांनी लंडनमध्ये काही शुट केलेले आहेत. एक खूप मोठ्या काळानंतर हार्दिक व अक्षया या जोडीची केमिस्ट्री पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळणार आहे.

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!