भारतात पहिले आधारकार्ड मिळालेल्या रंजना सोनवणे यांची दिवाळी अंधारात.
विदारक चित्र बघुन सोलर “दिवा” तसेच जीवनावश्यक वस्तुंची भेट देवुन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह जावुन शासकीय योजना तसेच गावात आरोग्य शिबीर घेण्याचे ठरले.
29 सप्टेंबर 2010 रोजी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टेभंली या गावी उद्घाटन केलेल्या आधार कार्ड सेवेच्या देशातील पहिल्या लाभार्थी सौ रंजना सोनवणे यांना दिवाळी निमित्त महाराष्ट्र शासनाचा शिधा वाटप वेळेवर न पोहचल्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची दिवाळी अंधारात गेल्याचे समजले.
त्यावर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम दादा कडलग व राष्ट्रवादी युवक ची टीम यांनी त्या कुटुंबाची घरी जाऊन भेट घेतली व विचारपुस केल्यावर समजले की येथील जनता या जुमला सरकारमुळे त्रस्त असुन आधार सेवेला 12 वर्ष पुर्ण होऊनही येथील जनता मुलभुत सुविधा पासुन वंचित आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेस कडुन एक हात मदतीचा म्हणुन त्या रंजना सोनवणे व त्यांच्या कुटुंबियांना किरणा देऊन आधार देण्याचे काम केले. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पुरूषोत्तम दादा कडलग यांनी आश्वासन दिले की लवकरच राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे या टेभंली गावात आरोग्य शिबीर राबण्यात येईल जेनेकरून तेथील नागरिकांना या शिबीराचा लाभ घेता येईल. सौ रंजना सोनवणे व त्यांच्या कुटुंबियांनी पुरुषोत्तम दादा कडलग व सर्व राष्ट्रवादी युवकांचे आभार व्यक्त केले