रा. काँ. माजी सैनिक सेलच्या रक्षाबंधनचा कार्यक्रम सौ. रुपालीताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित.

आज दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी १०१ प्रादेशिक सैन्य बटालियन (Territorial Army), पुणे येथे रक्षाबंधन चा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला.

हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली ताई चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, यावेळी रुपाली ताई व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या महिलांनी सर्व सैनिकांना राखी बांधुन सैनिकांना ओवाळले व अविरत सुरक्षा देण्याचे काम करत असल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

यावेळी 101 प्रादेशिक सैन्य बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल मनीष प्रियदर्शन, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपक गणपतराव शिर्के, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, पश्चिम महाराष्ट्र संघटक वसंत आजमाने, पुणे शहर अध्यक्ष अविनाश ढोले पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस माजी सेल लोहगाव चे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, रावसाहेब हराळ, शेकडो सैनिक व महिलांनी सहभाग घेतला.

यावेळी सैनिकांच्या कार्याची स्तुती करत सैनिकांवर अभिमान असल्याचे सांगीतले व खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलचे धन्यवाद व्यक्त केले.🇮🇳🙏
