हास्यास्पद : शेजाऱ्याला बघून पाळीव पोपट करायचा असे काही इशारे, पहा बातमी सविस्तर.

पुणेकर ! पुणेकर म्हटलं की आल चिडचिडा स्वभाव, उलट उत्तर आणि पुण्याबद्दल सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेलं म्हणजे पुण्यातील लोकांची दुपारची झोप, आणि उद्धटपणा. पुण्याच्या बाबतीत आपण बऱ्याच प्रकारच्या बातम्या याआधी पाहिल्या आणि वाचल्या देखील असतील. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. या पुणेकराने चक्क एका शेजाऱ्यावर पोलीस स्थानकात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आपण म्हणतो की, शेजार धर्म हा पाळायचा असतो ऐनवेळी आपल्याला शेजारीच उपयोगी येत असतात.
पण पुण्यामध्ये शेजाऱ्यावरच गुन्हा दाखल केला गेला आहे. तर पाहूया नेमकं गुन्हा दाखल करण्यामागचं कारण काय. बऱ्याच लोकांना प्राणी पक्षी पाळायची आवड असते. पाळीव प्राण्यांमध्ये बऱ्याच लोकांचा इंटरेस्ट असतो. त्यांना आवड असते. तसेच काही लोक पाळीव पक्षी म्हणून पोपट म्हणून पाळतात. पोपटा बद्दल सांगायचं झालं तर जे आपण बोलतो त्याला प्रत्युत्तर म्हणून पोपट देखील तसं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. कित्येक पोपट आपण बोलतानाही पाहिले आहेत किंवा ते शिट्टी देखील मारतात.
अशा या पक्षाला वैतागून त्या पुणेकरांनी आपल्या शेजाऱ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. त्या पक्षाच्या मालकाला त्याने शिवीगाळ केली आहे म्हणून त्याच्यावर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. आपण कोणाला बोलत असताना काही गोष्टींचे भान ठेवायचे असते. लोकांकडे शक्ती नसली तरी लोकांना कायदेकानून माहित असतात. रागात शिवी देन या माणसाला महाग पडले आहे.
तुमचा पोपट शिट्ट्या मारतो व त्याचा त्रास होतो म्हणून या पोपटाच्या मालकाला शिवीगाळ केल्याने पुण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश शिंदे या तरुणावर खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यामधील पाटील इस्टेट परिसरामध्ये राहणारे अकबर खान यांनी एक पोपट पळाला आहे. हा पोपट सुरेश शिंदे यांना बघून शिट्ट्या मारतो आणि म्हणून चिडलेल्या शिंदे यांनी खान यांना तुमचा पोपट माझी झोपमोड करतो, मला त्याचा खूप त्रास होतो. तुम्ही त्या पोपटाला दुसरीकडे ठेवा असं म्हणून शिवीगाळ केली आहे. यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.