संजय राऊत एकनाथ शिंदेना म्हणाले कि,
शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी जो शिवसेनेच्या विरोधामध्ये बंड केला आहे व दिवसेंदिवस जे काही घटना घडत आहेत ते पाहता या बंडखोरीला थोडेफार यश दिसून येत आहे
गेल्या दोन-तीन दिवसापासून शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी जो बंड केला आहे त्या बंडखोरीला काही अंशी यश येत आहे आणि याच दरम्यान शिंदे गटाकडून विधानसभेचे उपाध्यक्ष असलेले नरहरी यांना याबाबत त्यांनी पत्र पाठवले आहे. तसेच शिवसेनेने आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहे. संजय राऊत पत्रकारांशी बोलताना यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. याचबरोबर संजय राऊत असेही म्हणतात की तुम्ही जे आमदारांची संख्या व दाखवत आहात ते कागदावर दिसत आहे पण जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये याल तेव्हा दिशा वेगळी असेल हे लक्षात घ्या.
यासोबतच संजय राऊत बोलताना म्हणतात की, आता ही लढाई कायदेशीर सुरू आहे शिवसेनेसोबत बंड केलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे जे काही बहुमत दाखवत आहे ते फक्त आणि फक्त कागदावर दाखवत असून जेव्हा ते मुंबईमध्ये येतील तेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसेनेचे किती आमदार आहेत आणि ते आल्यानंतर नक्कीच शिवसेनेला साथ देतील असं संजय राऊत म्हणाले लोकशाही मध्ये बहुमत हा खेळ आकड्यांचा असतो जे आमदार बंडात गेली ते मुंबई मध्ये आल्यानंतर त्यांच्या निष्ठेची खरी कसोटी असणार आहे असही संजय राऊत.
तसेच संजय राऊत बोलताना म्हणतात की, कित्येक आमदार हे विधानसभेत आल्यानंतर शिवसेनेच्या फेवर मध्ये असतील आणि शिवसेनेला मतदान करतील आणि हे सगळं तुम्हाला येणारा काळच दाखवून देणार आहे बहुमत हे फक्त कागदावर वाढू शकतात पण मुंबईत आल्यानंतर दिसेलच आमदार कोणाच्या बाजूने आहेत या आमदारांवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे याबाबत मी जास्त काही बोलणार नाही जी प्रक्रिया सुरू आहे ते पुढच्या काही काळात दिसून येईल असेही संजय राऊत म्हणाले