” ती बाबासाहेबाची गाणी बंद कर ” असे म्हणत सरपंचानी दलित कुटुंबातील महिला आणि मुलींना केली मारहाण.
पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवानं अजूनही अशा घटना घडत आहेत. बाबासाहेबांचं गाणं वाजवलं म्हणून मुलाचा खून झाला होता. ही घटना जुनी होत नाही, तोच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे डीजेवर लावला म्हणून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी, यांचे विचार एवढा मोठा अडथळा ठरत आहेत का ? ज्याने अशा पद्धतीने त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करणाऱ्या लोकांना मारावे लागत.. हा धक्कादायक प्रकार घडला आहे यवतमाळ जिल्ह्यात, डी जे वर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी लावली म्हणून यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील कार्ला इथल्या एका दलित कुटुंबाला गावच्या सरपंचासह नातेवाईकांनी बेदम मारहाण केली.
या प्रकरणात मात्र पुढे कायदेशीर कारवाई झाली आहे. पुसद ग्रामीण पोलिसांनी नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे. अनुसयाबाई टाळीकुटे यांच्या मुलीचा विवाह होता. त्या निमित्ताने हळदीचा कार्यक्रम सुरू होता. दरम्यान डीजे वरती महापुरुषाची गाणी वाजवली गेली हे गाणं का लावलं म्हणून गावचे सरपंच रमेश राठोड त्या ठिकाणी आले त्यांनी गाणं बंद करण्यासाठी सांगितलं यावरून सरपंच आणि टाळीकुटे यांच्यात वाद झाला. त्यानंतर सरपंच यांनी आपल्या काही साथीदारानां घटनास्थळी बोलवलं टाळीकुटे कुटुंबातील महिला आणि पुरुष सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी काही जणांना पाठीवर जखमा झाल्या तर महिलांना सुद्धा जबर मारहाण केली अशी तक्रार आशाबाई टाळीकुटे यांनी पोलिसात दिल्या.
सरपंच रमेश राठोड यांच्यासह अन्य नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही एकालाही अटक झाली नाही. चार दिवसापासून सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी इथे वाजवू नका इथून निघून जा असा सल्ला या सरपंचांनी टाळीकुटे कुटुंबीयांना दिला त्यानंतर संतापून राठोड यांनी आपला मुलगा गोविंद, अमोल, दयाराम, वाघू चव्हाण, सदानंद राठोड, देवू राठोड, राजू राठोड यांना बोलावलं. या सर्वांनी टाळीकुटे कुटुंबीयांना बेदम मारहाण केली तेवढेच नाही तर टाळीकुटे कुटुंबातील महिला आणि मुलींना देखील मारहाण केली.
जातिवादी लोकांमुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होण्यासाठी अशा घटना पूरक ठरतात. सर्वांना एकमेकांसोबत घेऊन माणसाने एकमेकाला माणसाप्रमाणे वागणं महत्त्वाचा आहे. सार्वजनिक कार्यांमध्ये असे व्यत्यय आणणं हे फार चुकीचा आहे. सर्व समाजाला, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन गुण्या गोविंदाने नांदण्याची संस्कृती या महाराष्ट्राची आहे .