लेकरांना जपा ! 4 वर्षांची चिमुकली पाचव्या मजल्यावरून पडून मृृत्यू, हृदयद्रावक घटना.
लहान मुलं कधी काय करतील याचा काही नियम नसतो, त्यामुळे लहान मुलांना खूप काळजीपूर्वक जपाव लागत , एका लहान मुलीच्या बाबतीत अशीच एक दुर्घटना घडली, ही बातमी मिरज शहरातून आपल्या हाती आली आहे. एक मुलगी चक्क पाचवा मजल्यावरनं खाली पडली यात दुर्दैवानं तिचा मृत्यू झाला,चुकून गॅलरीचा दरवाजा उघडा राहिला होता आणि त्यामुळेच हा मोठा अनर्थ घडला,सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना संध्याकाळी घडली. यष्वी दीनेश देशमाने असे या मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिरज शहरातील झारीबाग परिसरातील बुधगावकर मळा येथे ही घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरजेतील क्षकिरण तज्ञ डॉ. निलेश देशमाने हे झारीबाग परिसरातील एका अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावर राहतात. डॉ. देशमाने यांना दोन मुली आहेत. त्यांची मोठी मुलगी आजारी असल्याने देशमाने दाम्पत्याने सोमवारी रात्री तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेले होते.
मात्र यावेळी रुग्णालयात जात असताना त्यांची लहान मुलगी यशवी ही झोपेत असल्याने डॉ. देशमाने यांनी घराला बाहेरून कुलूप लावून गेले. परंतु ते बाहेर जात असताना गडबडीत गॅलरीचा दरवाजा मात्र बंद करण्यास विसरले होते.
थोड्या कालावधीनंतर यशविला जाग आली. ती पालकांना शोधत गॅलरीत गेली. त्याचवेळी ती पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
परंतु मंगळवारी पहाटे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस याबाबत तपास करण्यात येत आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनेची नोंद महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे झाली आहे. याप्रकरणी अधिक तपास महात्मा गांधी पोलीस अधिक तपास करत आहेत.