” आय लव्ह यु ” म्हण नाहीतर बॅनर लावीन; पहा काय आहे प्रकरण सविस्तर.
प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रेम होत असतं कधी तारुण्यात होतं कधी महाविद्यालयीन काळात होतं. ते कधी शालेय वयात देखील प्रेम होतात कधी कधी कोणाला एकतर्फी प्रेम होतं. बऱ्याचदा या प्रेमाला विरोध केला जातो आणि त्यामुळे अनेक जोडपे हे सैराट होतात. असे प्रेमाबद्दलचे अनेक किस्से तुम्ही आजवर ऐकले असेल. हे प्रेम कधी खूप चांगलंही असतं मात्र हे प्रेम कधी जीव घेणे देखील ठरू शकतात.
जेव्हा हेच प्रेम एकतर्फी असतं तेव्हा या प्रेमाचे वाईट बाजू समाजा समोर येते. असाच एक प्रकार औरंगाबाद मध्ये घडला. एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकारसमोर आलाय. एका विवाहितेला एक मजनू सातत्याने त्रास देत होता. ” आय लव यू ” म्हण नाही तर तुझे बॅनर लावीन अशी धमकी तो सातत्याने द्यायचा. त्यामुळे एकतर्फी प्रेमातून मुलं कुठल्या थराला जातात याचा प्रत्यय येत आहे.
औरंगाबादमध्येही असच एकतर्फी प्रेमातून विचित्र प्रकार समोर आला आहे. ‘आय लव्ह यु’ म्हण नाहीतर बॅनर लावीन अशी धमकी देत सचिन दाभाडे नावाच्या तरुणानं एकतर्फी प्रेमातून एका महिलेला त्रास दिला. नवऱ्याच्या वाईट संगती बाबत सांगायचं आहे असे म्हणत एका तरुणानं महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला. नंतर ओळख वाढवून त्रास देऊ लागला.
म्हणून त्या महिलेनं तरुणाचा मोबाईल नंबर ब्लॉक केला असता, त्याने राग काढण्यासाठी तिला धमकवण्यास सुरुवात केली. ‘आय लव्ह यु’ म्हण नाहीतर आपल्या फोटोचं बॅनर लावून बदनामी करण्याची धमकी त्या महिलेला देण्यास सुरुवात केली. अखेर त्या तरुणाबाबत सदर विवाहितेने तक्रार दाखल केली आहे. मात्र आरोपी फरार असल्यानं पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पोलीस या माते फिरू मजनूला लवकरात लवकर पकडतील आणि सज्जड दम भरतील योग्य ती कारवाई करतील आणि या महिलेला या त्रासापासून मुक्त करतील. आपल्या सोबतही कधी अशा प्रकार घडत असेल तर आपण आपल्या पोलीस मित्रांना पोलीस दीदींना याबद्दलची माहिती देणे महत्त्वाचे आहे जेणेकरून आपण या त्रासातून मुक्त होऊ शकतो.