अनुसूचित जातीचे विद्यार्थी यांना नामांकित विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना मिळते शिक्षणाची संधी.
परदेशात शिक्षण घ्यायचे शिष्यवृत्ती अर्ज सादरीकरणासाठी शेवटची मुदत 22 जून ही आहे.
अनुसूचित व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना त्यांची परिस्थिती नसल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही पण जर त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल त्यांना शिक्षण घ्यायचे असेल पण विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही फक्त आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहावे लागते अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना बाहेर देशात जाऊन शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्याकडे असलेल्या गुणवत्तेला चांगला वाव मिळावा यासाठी परदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पीएचडी अभ्यासक्रमाकरता प्रवेश मिळाला आहे अशा पन्नास विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते यामध्ये पीएचडी चे 24 तर पदव्युत्तर चे 26 अशा एकूण 50 जणांचा समावेश असतो.
काय मिळणार या मध्ये काय लाभ मिळणार आहे ते आपण पाहू
या योजनेसाठी चे विद्यार्थी पात्र असतील अशा विद्यार्थ्यांना विमानाचे प्रवासभाडे, बाहेर देशातील शैक्षणिक संस्थेचे असणारे शिक्षण शुल्क, निर्वाहभत्ता, आकस्मित खर्च आधी या सर्वांचा लाभ मिळणार आहे. एकाच कुटुंबातील फक्त दोन जण या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेच्या काही अटी देखील आहेत
या योजनेसाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा व त्याचा रहिवास हा महाराष्ट्रातील असावा त्याची कमाल वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि त्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे ते सहा लाखांपेक्षा जास्त नसते पाहिजे. यामध्ये पी.एच. डी. अभ्यासक्रमासाठी 50 टक्के असले पाहिजे तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 55 टक्के असणे अनिवार्य आहे.
यासाठी लागणारे कागदपत्र आपण पाहू :
परदेशामध्ये शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याला काही महत्त्वाची कागदपत्रे देखील लागतात. यामध्ये जर आपल्याला शिष्यवृत्ती घ्यायची असेल तर त्यासाठी असणारा अर्ज. जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, आपले उत्पन्न प्रमाणपत्र, पदवी किंवा पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे पुरावे, परदेशातील जागतिक मानांकन 300 पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या बाबतचे विनाअट ऑफर लेटर, यासह प्रवेश मिळाल्याची प्रत देखील आवश्यक आहे.
अर्ज कसा करणार ?
परदेशातील शिक्षणाच्या संधीसाठी शिष्यवृत्ती प्राप्त करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करून तो कागदपत्रांसह समाज कल्याण आयुक्तालय मध्ये सादर करणे गरजेचे आहे.
WWW.MAHARASHTRA.GOV.IN/1143/CAREERS