जमिनीच्या वादावरून चुलत्याने पुतणीसोबत पहा काय केले, बातमी सविस्तर.
आईच्या नावावर असलेली 6 एकर जमीन माझ्या नावावर खरेदी करून दे असे म्हणून वारंवार भांडण करणाऱ्या सख्या भावानेच भावाच्या मुलीलाच (चुलत्याने पुतणीला) संपवतो म्हणून मुलीला सिना नदीच्या पात्रात टाकुन तिचा खून केल्याची घटना घडली आहे .जमिनीच्या वादातून मुलीचा खून करून प्रेत सीना नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना ( सोमवार) सकाळी ७ . ३० च्या सुमारास वाजता घडली. ज्ञानदा यशोधन धावणे (वय – ४ वर्षे, रा. डिकसळ ता.मोहोळ) असे मयत चिमुकलीचे नाव आहे.
मोहोळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की यशोधन आणि यशोदीप शिवाजी धावणे ( दोघे रा. डिकसळ ता. मोहोळ) या दोघे आई वडीला सह एकत्र राहातात. या दोघा भावांच्यामध्ये आईच्या नावावर असलेल्या ६ एकर जमिनीच्या वाटपा वरुन वाद सुरू होता. त्यांन एकुण १६ एकर जमीन होती ती दोघा मुलांना ५ /५ एकर वाटून दिली होती व राहीलेली ६ एकर जमीन आईच्या नावावर होती ती सर्व जमीन माझ्या नावावर करून द्या म्हणून यशोदीप घरात सतत भांडणे करीत होता. यामध्ये गावकऱ्यांनी ही मध्यस्ती केली होती. त्यामध्ये याच वादातून आज सोमवारी सकाळी दोघा भावात भांडण झाले. मला आईच्या नावावरील जमीन केवळ तुमच्या मुळे मिळत नाही त्यामुळे मी तुमचा वंशजच जिवंत ठेवत नाही अशी धमकी यशोदीपणे दिली होती.
भांडणातर यशोधन आणि त्यांची पत्नी चिमुकली ज्ञानदाला घरात झोपवून शेतात कामासाठी गेले. सकाळी ८ .३० च्या सुमारास दोघे जण शेतातून घरी आल्या नंतर त्यांना कु ज्ञानदा वय ५ वर्ष तिथे दिसली नाही.त्यामुळे पती पत्नीनी तिचा शोध सुरू केला. तेव्हा राजेश नारायण घावणे सुनिल गंगाधर धावणे यांनी यशोदीप हा मोटार सायकलवर पेट्रोल च्या टाकीवर मुलीला झोपल्या च्या अवस्थेत घेऊन मलीकपेठ कडे जाताना दिसला असे सांगीतले.
तेव्हा यशोधनने ,भाऊ यशोदीपला ,माझ्या मुलीला कुठे पाहिलेस का ? असे म्हणून मोबाईल वरून विचारले असता मी तिला जीवे मारून मलीकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात फेकून दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर मलीकपेठ येथील सीना नदीच्या पात्रात जाऊन पाहीले असता चिमुकल्या ज्ञानदाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. तिचा मुतदेह मोहोळ येथील शासकिय रुग्णालयात आणला असता तिला मृत घोषीत करण्यात आले. मोहोळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.