मुंबईत शिंदे गटाच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटना वेळी पाहा काय घडलं.
दादरला शिंदे गटाचं सेना भवन उभे राहणार हा मुद्दा चर्चेत असतानाच शिंदे गटाकडून मुंबईत पहिला शाखेचे उद्घाटन झाले. या उद्घाटनाच्या वेळी नेमकं काय घडलं आणि हा मुद्दा पुन्हा चर्चेत का आला ते पाहुयात,
गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेत सुरू असलेल्या शिंदे आणि ठाकरे संघर्ष हा दिवसेंदिवस वेगवेगळे वळण घेत आहे. आता यामध्ये स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र सेना भवन होणार अशी चर्चा शिंदे गटामध्ये सुरू झाली आहे. यामध्ये काही मतांतरे देखील आहेत. दादर आणि ठाण्यात हे सेना भवन उभे राहिल तर काही आमदार म्हणतात की, हे मध्यवर्ती कार्यालय असेल. प्रती शिवसेना भवन उभारण्याचं ठरवलं जाणार आहे असं म्हटलं जातं.
शिंदे गटाकडून आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, शाखांचे उद्घाटन सुरू झाल आहे. पहिला नंबर मारला तो खासदार राहुल शेवाळे यांच्या मतदारसंघात मानखुर्द या ठिकाणी. शिंदे गटातील पहिल्या शाखेचे उद्घाटन झाले या उद्घाटनाच्या वेळी बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे. मात्र या शाखेच्या बॅनरवरन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार होता.
यांचा कुठेही फोटो दिसत नाहीये या ठिकाणी पहिल्या शाखेचे उद्घाटन होताना सर्वांनाच आनंद होतोय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा भगवा फडकण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आणि त्यामुळेच मुंबईतील प्रत्येक वार्डमध्ये शिवसेनेच्या अशा शाखा उभा राहतील अशी महिती मिळते.