शिंदे सरकार मधील कॅबिनेटच्या पदासाठी लागली एवढा रुपयांची बोली. पाहा काय आहे किंमत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली व राज्यामध्ये शिंदे व भाजप सरकार स्थापन झाली. पण हे दोघांचे मिळून सरकार स्थापन होऊन देखील २० दिवस उलटून गेले आहेत. पण आजही अजून पर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राजकारणाच्या बाबतीत रोजच मंत्रिमंडळ पदाची घोषणा कधी होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. पण अशातच काही भामट्याने संधी साधली आहे. जर तुम्हाला शिंदे गटाच्या सरकारमध्ये मंत्रीपद पाहिजे असेल तर मंत्रीपद मिळवून देण्यासाठी १०० कोटींची मागणी करण्यात आली आहे. आणि असा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांनी उघड केला या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मंत्री मंडळाचा अजूनही विस्तार नाही. त्यामुळे प्रत्येक आमदार हा आपल्याला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावे यासाठी धडपड करत आहे. आणि यातच मुंबईमध्ये एका राष्ट्रीय पक्षाच्या आमदाराला तब्बल 100 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. असा प्रकार उजेडात आला आहे आणि एवढेच नाही तर यामध्ये आणखी तीन आमदारांनाही अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न झालेला आहे असं एबीपी माझा ने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मागील काही दिवसापासून या चार भामट्यांनी मिळून आमदारांना गाठले व आमदारांना भेटून मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला स्थान मिळवून देतो, असे आमिष दाखवून तीन आमदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न देखील केला आहे. आणि आमदारांना विश्वासात घेण्यासाठी आम्ही दिल्लीकडून आल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे वरिष्ठ मंत्र्यांनी तुमचा बायोडेटा मागितला आहे अशा प्रकारच्या भूलथापाही मारल्या. आणि हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर सदरील आमदारांना फोन करून मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला जर मंत्रीपद पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी १०० कोटी रुपये मोजावे लागतील अशी मागणी केली. आणि यामधील एक धक्कादायक बाब म्हणजे हे चार आरोपी एका मोठ्या नेत्याच्या संपर्कामध्ये आहे अशी माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वी १७ जुलै रोजी आरोपींनी आमदारांना ओबेरॉय हॉटेलमध्ये भेटायला सुद्धा बोलावलं होतं.
मंत्रिमंडळामध्ये जर तुम्हाला स्थान पाहिजे असेल तर यासाठी आरोपींनी एक रक्कम ठरवून त्यामधील 20% रक्कम आता द्यायची होती. आणि उर्वरित रक्कम शपथविधी पार पडल्यानंतर द्यायची असा आरोपींनी या आमदारांना सांगितलं होतं. आरोपींनी सोमवारी आमदारांना नरिमन पॉईंट वर भेटण्यासाठी बोलावलं व त्यानंतर आमदारांनी पैसे घेण्यासाठी हॉटेलमध्ये ओबेरॉय नेले होते.
याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला व अँटी एक्स्ट्राशन सेलने या आरोपीला पकडले. या आरोपीला कसून चौकशी केली असता तीन जणांची नावे समोर आली. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी एका आमदाराच्या खाजगी सचिवाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. रियाज शेख, योगेश कुलकर्णी, सागर सांगवी, जाफर उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. यामध्ये आणखी किती आमदारांना या आरोपींनी फसवले आहे याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.