‘ न आवडती ‘ भाजी बनवल्यामुळे पाहा मुलाने आईसोबत काय केले !!

आजकाल कोण काय करेल आणि कुणाला कशाचा राग येईल सांगता येत नाही. आज काल मुलांमध्ये रागाचे प्रमाण वाढले आहे. अतिशय शुल्लक कारणावरून देखील त्यांना राग येतो त्यांनी सांगितलेली गोष्ट नाही ऐकली किंवा ती पूर्ण नाही झाली की चिडचिड करायला लागतात. आदळआपट करायला लागतात अशीच एक घटना घडली आहे. मुलं जेवणासाठी त्यांचा आवडता पदार्थ खाण्यासाठी आग्रह करत असतात व त्यांची आवडतीच भाजी बनवली गेली पाहिजे असा आग्रह आईकडे करत असतात. एका व्यक्तीने आपल्या आईला मासे बनवायला सांगितले पण आईने माशाची भाजी बनवणे ऐवजी वांग्याची भाजी बनवली आणि या गोष्टीचा त्या मुलाला राग आला आणि रागाच्या भरात त्या मुलाने जन्मदात्या आईची हत्या केली आणि या प्रकरणांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली हा व्यक्ती ठाण्यातील रहिवासी आहे.
आरोपी व्यक्ती व त्याची आई ठाणे जिल्ह्यातील एका वीट भट्टीवर काम करायचे व तिथेच एका झोपडी मध्ये राहत होते. आणि होळी साजरी करण्यासाठी म्हणून तेथील कामगार आपल्या गावी गेले होते. संध्याकाळी ७ वाजता आरोपी नरेश व त्याची आई झोपडी मध्ये होते व यांचे एकमेकांसोबत वांग्याची भाजी बनवल्यावरून भांडण झाले.आरोपी नरेश त्याच्या आईला विचारतो की, मी तुला मासे बनवायला सांगितले होते ते मासे का नाही बनवले व त्या ठिकाणी बटाट्याची, वांग्याची भाजी का केली व ती करूनही त्या भाज्या शिजल्या नाहीये असं तो म्हणाला. त्याची आवडती भाजी न बनवल्यामुळे तो संतापला होता आणि संतापल्याच्या भरात त्याने लोखंडी रोड उचलून आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. यांचे भांडण चालू असताना शेजाऱ्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत याच्या कडील लोखंडी रोडच्या मारहाणीमुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला होता.
स्वतःच्या आईचा खून केल्यामुळे त्याच्यावर FIR नोंदवण्यात आली होती, पण खटल्या दरम्यान नरेशने तो निर्देश असल्याचे सांगितलं. फिर्यादी पक्षाकडून दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ७ साक्षीदारांकडून साक्षी घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने आरोपी नरेश याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पण नरेशने कल्याण न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जाऊन मुंबई उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती. आणि या याचिकेवर न्यायमूर्ती वराळे व कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. वकील इनामदार म्हणतात की, आरोपीला संताप आला होता व रागाच्या भरात त्याने लोखंडी रोडणे त्याच्या आईची हत्या केली आहे. त्याच्या आईच्या पाठीवर दोन-तीन वार केले गेले आहेत आणि यामुळे त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे.
आजकालच्या मुलाच्या या रागाने जन्मदाती आई त्याच्यापासून दूर गेली. अतिशय क्षुल्लक कारणावरून हे वाद कोणत्या ठरला जाऊन बसले आहेत. त्यामुळे मुलांच्या रागावर नियंत्रण असणे पण पालकांची प्राथमिक जबाबदारी आहे.