देशातील प्रचंड विरोध पाहून ” अग्निपथ ” योजनेत मोदी सरकारने केले हे बदल.

देशांमध्ये सगळीकडे बेरोजगारी चालू असताना देशाचे पंतप्रधान व केंद्र सरकार एक नवीन योजना चालू करतात ज्याने करून बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल आणि युवा जनांच्या हाताला काम मिळेल भारत सरकार कडून एक योजना जाहीर केली जाते जिचे नाव अग्निपथ योजना आहे भारत देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या योजनेबाबतची घोषणा त्या दिवशी केली आणि अग्नीपथ योजनेमध्ये युवा तरुणांना चार वर्षासाठी सैन्या मध्ये दाखल केले जाणार आहे चार वर्ष संपल्यानंतर त्या योजनेनुसार भरती केले जाणार यांपैकी 80 टक्के जवान यांना निवृत्त केले जाणार योजना जाहीर करताच देशभरामधुन प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला गेला जेव्हा तरुण चार वर्ष सैन्यदलामध्ये सेवा करणार भरती करून घेतल्यानंतर तो तरुण तो जवान चार वर्ष भारत सरकारच्या सैन्यदलामध्ये काम करणार आहे पण त्याच्या वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्याला लष्करातून काढून टाकला जाणार आणि जेव्हा त्याला काढून टाकला जाणार त्यानंतर या तरुणाने करायचं काय ? त्यांनी जायचं कुठे ? असे प्रश्न बऱ्याच जणांनी निर्माण केले. मोदी सरकारला विचारले मोदी सरकार हे पैसे वाचावेत अशा हेतूने तरुणांच्या भविष्याशी खेळत आहेत असा आरोप देखील मोदी सरकारवर केला जात आहे.
गेल्या दोन ते चार दिवसापासून भारत देशामध्ये रस्त्यावर उतरून बऱ्याच जणांनी अग्निपथ योजनेला कडक विरोध केला आहे त्याचप्रमाणे संरक्षण तज्ञांनीदेखील याबाबतची चिंता व्यक्त केले आहे सैनिकावरील खर्च, पेन्शन साठी लागणारा खर्च कमी करता येईल यासाठी या मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. तिन्ही सेवेतील भरती व प्रशिक्षणाबाबत असे प्रयोग करणं अत्यंत चुकीचा आहे पाकिस्तान व चीन सारखे जेव्हा शत्रू आपल्या दोन्ही बाजूने उभे आहेत अशा शत्रु सोबत सामना करायचं झालं तर आपल्याला पूर्ण वेळासाठी सैनिकांची भरपूर गरज पडणार आहे आणि जर आपण अशातच फक्त चार वर्षांसाठी म्हणून सैन्यात भरती करून घेणार असाल तर त्या तरुणांमध्ये त्या सैनिकांमध्ये विश्वास निर्माण होतो तो निर्माण होऊ शकणार नाही. नियमितपणे सैनिकां प्रमाणे कुशल व शिस्तबद्ध योद्धा बनू शकत नाही असं मत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची आहे
या वर्षभराच्या अखेरीपर्यंत अग्निपथ योजनेअंतर्गत जवळजवळ 96 हजार सैनिकांची भरती केली जाणार असून त्यापैकी 40हजार भरती ही फक्त लष्करासाठी व उर्वरित भरतीची आहे ती हवाई दलासाठी व नौदल साठी होणार आहे यामध्ये होणारी पहिली भरती ही 90 दिवसात होऊ शकते बऱ्याच तरुणांचे वय लष्करी भरती कधी होईल या प्रतीक्षेत त्यांचे वय निघून गेले आहे ते फार निराश देस्खील झाले आहेत आणि त्यामुळेच या तरुणांमध्ये याबाबतची भरपूर प्रमाणात निराशा पसरले आहे म्हणूनच मोदी सरकारने या मध्ये थोडेसे बदल केले आहेत
काय आहे ते बदल आपण जाणून घेऊया !!
संपूर्ण देशामध्ये अग्निपथ योजना जाहीर केली आहे या योजनेसाठी भरपूर प्रमाणात विरोध झाला आहे आणि हा विरोध लक्षात घेऊन जर तरुणांचा राग शांत करायचा असेल तर त्यासाठी काहीतरी बद्दल काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असे मोदी सरकारने विचार करून तरुणांचा राग शांत कसा होईल यासाठी मोदी सरकारने सैन्यदलामध्ये भरतीच्या वयोमर्यादा आहेत त्यामध्ये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. भरतीसाठी वयाची अट २३ केली आहे यामुळे या भरतीसाठी वाट पाहणारे तरुण आहेत त्यांच्यामध्ये एक प्रकारची आशा या ठिकाणी निर्माण करायचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे पण त्यामध्ये देखील ही सवलत आहे कि, संधी फक्त एकदाच मिळणार असल्याचे मोदी सरकारने या ठिकाणी सांगितले आहे त्यानंतर यापुढे जी भरती असेल त्यानुसार अग्निपथ योजनेच्या वयोमर्यादा नुसार होणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे तरुणांनी लष्करामध्ये भरती होण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांना एक सवलत मोदी सरकारने देऊ केलेली आहे आणि त्या तरुणांना या संधीचं सोनं करायचं आहे.