स्थानिक गुन्हे शाखेत हप्तेखोरी; खा. निलेश लंके यांनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष
सात दिवसांत कारवाई न झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सुरू असलेल्या हप्तेखोरीकडे खासदार नीलेश लंके यांनी लक्ष वेधले असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह शाखेतील कर्मचाऱ्यांची खा. लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते विजय वडेटटीवर, अंबादास दाणवे, पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. सात दिवसांत कारवाई न झाल्यास नगरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयापुढे सबळ पुराव्यांसह उपोषण करण्याचा इशारा खा. लंके यांनी दिला आहे.
यासंदर्भात खा. लंके यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये नमुद करण्यात आले आहे की, संतांची पावनभुमी असलेल्या नगर जिल्हयामध्ये काही वर्षांपासून जनतेचे रक्षक असणारे पोलीस खात्यामधील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी राजरोसपणे हप्ते घेत असल्याचा आरोप खा. लंके यांनी केला आहे.
जिल्हयात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले असून महाराष्ट्रात सर्वात जास्त गुन्हेगारी असणारा जिल्हा म्हणून नगर जिल्हा ओळखला जातो. बीफ मटन, ऑनलाईन क्लब, वाळू, गुटखा, दारू, गांजा, चंदन तस्करी, मटका, बिंगो हे सर्व व्यवसाय पोलीसांच्या आशीर्वाद व आश्रयाखाली मोठया प्रमाणात सुरू असल्याचे खा. लंके यांनी नमुद केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी सामान्य जनतेस वेठीस धरीत आहेत. जिल्हयातील सुवर्णकार व्यवसाय करणारे सराफ व्यवसायीकांना दमदाटी करून खोटया गुन्हयांमध्ये अडकवू असे धमकावतात. जिल्हयामध्ये इतर सर्व कारणांमुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या तक्रारी वारंवार माझ्याकडे स्थानिक नागरीकांनी केल्या आहेत व करीत आहेत. या प्रकरणातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विशेष दर्जा असणा-या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषींवर सात दिवसांत कारवाई करण्यासंदर्भात आदेशित करण्यात येऊन सर्व अवैध व्यवसाय बंद करण्यात यावेत अशी मागणी खा. लंके यांनी केली आ