स्व. विनायक मेटे यांच्या पत्नीबद्दल पहा छत्रपती संभाजीराजे हे काय म्हणाले आहेत. बातमी सविस्तर.

पुणे मुंबई एक्सप्रेस वे वरती शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक माजी आमदार विनायक मेटे यांचा अपघाती निधन झाले. त्यांचा अपघात होता की घातपात होता याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची पत्नी ज्योती मेटे यांनी केली. या आता पुढे काय असा सवाल शिवसंग्राम चे कार्यकर्ते त्याचबरोबर सर्व पदाधिकारी आणि राजकारणातील काही मंडळी विचारत आहेत.
राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे यांनी म्हटलं की, ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर ती आमदार घ्या अनेकांचं म्हणणं आहे मंत्रीपदही द्या यात विनायक मेटे यांच्या आईने केला होता. माझ्या मुलाला जर मंत्री करायचा नव्हतं तर नव्हत द्यायचं पण माझा मुलाला मारायला नको होता. असा टाहो या मातेने फोडला होता तर तीन ऑगस्ट ला देखील विनायक मेटे यांच्यासोबत काही तरी बरं वाईट होणार होतं या संदर्भातले ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली.
त्यामुळे हे प्रकरण काहीच वेगळं वळण घेत आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. यातच आता शिवसंग्राम संघटनेचे पुढची भूमिका काय असेल शिवसंग्राम संघटनेचे पुढे काय होईल याबद्दल महत्वाचा वक्तव्य केल्याने महत्त्वाची मागणी केलीये. छत्रपती संभाजीराजे यांनी मेटे यांच्या बीड येथील निवासस्थानी भेट घेऊन मेटे कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी मराठा समाज आणि शिवसंग्राम पक्ष आणि संघटनेला टिकवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्योती मेटे यांना आमदारकी द्यावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.
संपूर्ण आयुष्य मराठा समाजासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या आणि त्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळाले पाहिजे. राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातील तमाम गरीब मराठा समाज यांना न्याय मिळेल मुख्यमंत्री आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी राज्यपाल नियुक्त आणि इतर कुठल्याही आमदारकी द्यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. मराठा समाजासाठी संपूर्ण आयुष्य काम करणाऱ्या नेत्याच्या कुटुंबाला आणि संघटनेला बळ मिळालं पाहिजे तसंच राजकीय पाठबळ मिळाल्यास महाराष्ट्रातल्या तमाम गरीब मराठ्यांना न्याय मिळेल.
मेटे यांच्या पत्नी नवऱ्यासोबत उभ्या राहिल्या आहेत, त्यांचे योगदान फार मोठे आहे आणि त्यामुळेच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना आमदारकी द्या अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या या मागणीची दखल आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसे घेतात मेटे कुटुंबीयांच्या पदरी या सरकारकडून काही पडते का हे पाहणं फार महत्त्वाचं ठरेल आणि या प्रकरणातील तपास कसा होतोय हे पाहणे देखिल तितकाच महत्वाचा आहे.