शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न झाली.
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-15-at-8.39.16-PM-780x470.jpeg)
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-15-at-8.39.16-PM-780x470.jpeg)
आष्टी या ठिकाणी शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची बैठक संपन्न झाली यामध्ये दासू शिंदे व दीपक भैय्या गरुड यांच्या अध्यक्षतेखाली सदरची बैठक संपन्न झाली. या बैठकी मागील उद्दिष्ट पक्ष प्रवेश व पक्ष बांधणी हे असून या सोबतच पक्षाची ध्येय धोरण व चांगले काम करावे यासाठी बैठक करण्यात आली.
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-15-at-8.39.15-PM-1024x462.jpeg)
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-15-at-8.39.15-PM-1024x462.jpeg)
सदरच्या बैठकीमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक भैय्या गरुड तालुका अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष दासू शिंदे हे उपस्थित होते. त्याचबरोबर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे पाटोदा तालुकाध्यक्ष प्रवीण थोरात, युवक तालुकाध्यक्ष अविनाश निकाळजे, आष्टी शाखा अध्यक्ष अक्षय निकाळजे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे दीपक गायकवाड तालुका उपाध्यक्ष पश्चिम, हिंदू राष्ट्रीय सेना अध्यक्ष शरद शेकडे, कांबळे साहेब बी एस पी, काँग्रेसचे शिंदे साहेब हे उपस्थित होते.
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2022/07/PORTAL-PRATINIDHI-scaled.jpg)
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-15-at-8.39.16-PM-1024x462.jpeg)
![](https://newsmall18.com/wp-content/uploads/2023/09/WhatsApp-Image-2023-09-15-at-8.39.16-PM-1024x462.jpeg)
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असून ज्या ठिकाणी सामाजिक गरज भासेल त्या ठिकाणी हा पक्ष व पक्षाचे कार्यकर्ते पुढे असतात.