कोपरगाव मधील ग्रामसेवकाची ” ती ” ऑडीओ क्लीप व्हायरल, पाहा काय म्हणाले आहेत ग्रामसेवक सविस्तर.
कोपरगाव मधील ग्रामसेवकाच्या ऑडिओ क्लिप चा सध्या मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. ग्रामसेवक भिमराज बागुल व ग्रामपंचायत शिपाई यांच्यामधील संभाषणाची ही ऑडिओ क्लिप असल्याचे ग्रामस्थांनी दावा केला आहे. संभाषणामध्ये ग्रामसेवक सरपंचावर आक्षेपार्ह भाषात बोलल्याचं दिसत आहे. ” आता गट विकास अधिकारी यांच्या हातून आपण त्यांची जिरावणार ” असल्याचं त्यामध्ये ऐकू येत आहे त्यामुळे नाटेगाव सह तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
कोपरगाव मधील धोंडेवाडी येथील ग्रामसेवक हे गैरव्यवहार मध्ये अडकले असून त्यांच्यावर शिर्डी येथे गुन्हा दाखल होऊन काही महिने उलटूनही अद्याप पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ग्रामसेवक हे बेताल पद्धतीने वागू लागल्याचं ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. आणि अशातच तालुक्यातील नाटेगाव मध्ये ग्रामसेवक पदावर असणारे बागुल यांनी वादग्रस्त विधान सरपंचा बद्दल केलेला आहे. नाटेगावात 30 जुलै रोजी एक ग्रामसभा झाली यामध्ये ग्रामसेवक शिक्षकांना आक्षेपार्ह भाषेत बोलले होते आणि त्यावरून गावात दोन तट पडले.
ग्रामसभेत मोठ्या प्रमाणावर आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आले. नाटेगाव येथील रहिवासी व कोपरगावात तात्पुरते रहिवासी असलेले ठेकेदार मोरे यांच्या खुर्चीवर बसण्यावरून हा वाद निर्माण झाला होता. ग्रामसभेत कृषी सहाय्यक, शिक्षक, वीजतंत्री यांचे कौतुक झाले. मात्र ग्रामसेवक यांच्यावर टीका झाल्याने ग्रामसेवक दुखावल्याचे सदरचे ऑडिओ क्लिप मध्ये प्रथमदर्शनी ऐकू येत आहे. आणि अशा वेळेस ग्रामसेवकाची गाडी रुळावरून घसरली असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यांनी दोन कॉटर मारल्याची आपल्या सहकार्यासोबत भ्रमणध्वनीवरून बोलताना कबुली देखील दिली. एका गटाने सदर ग्रामसेवक यांना सदर शिक्षकांची भर ग्रामसभेत माफी मागण्यास भाग पाडलं होतं आणि यावरूनच हे रणकंदन घडलं असावं.
” सरपंच हांडगा आहे एकटा ग्रामसेवक जबाबदार धरता व इतरांना अंग देता, अध्यक्ष असताना ग्रामसभा चालवता येत नाही याला दोष माझा आहे का ? तू माझ्या जीवाचा माणूस आहे, म्हणून मी खेळ करणार आहे ” व स्वतःला दोष लावून घेताना दिसत आहे. ” शिक्षकांनी कसे वागायचे हे मला सांगायची गरज नाही. माझे सासरे सासू मुख्याध्यापक आहेत, अन्य नातेवाईक देखील शिक्षक आहेत, कोळपेवाडी येथे माझे नातेवाईक शिक्षक आहेत, धोत्रे येथील नातेवाईक शिक्षक आहेत. मला शिक्षक कोण हे सांगता का ? व मी उद्धट लागेल का ? ” असा सवाल विचारला आहे. ” माझा खेळच वेगळा आहे, आपण आता जे काही करायचे ते स्वतः करणार नाही तर बी.डि.ओच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळ करणार ” असा दावा यामध्ये केला आहे. हा खेळ नेमकं कोणता हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. पुढील बैठकीत मी दारू पिऊन येणार असल्याचंही या संभाषणात ग्रामसेवक म्हणत आहे.
याबाबत ग्रामसेवक बागुल यांना संपर्क केला असता, जुन्या कामावरून विचारणा झाली व ती देण्यास आपण असमर्थ झालो होतो. तथापि शाळेचे काम आवश्यकता अपूर्ण अवस्थेत होते व त्या ठिकाणी काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शाळेत बसवण्याचा प्रयत्न केला होता. त्या ठिकाणी अस्वच्छता असल्याने विद्यार्थी त्याची साफसफाई करत असल्याने त्यास काही पालकांनी हरकत घेतली होती. त्यावरून वाद वाढला. व काही सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यास राजकीय रंग दिला असं बोललं गेलं. मात्र आपण दरवाजा आणि खिडकीचे काम झालेले नसल्याने व तांत्रिकदृष्ट्या हे अपूर्ण असल्याने त्यात शाळा भरण्यास नकार दिला होता. त्याचा काही राजकीय कार्यकर्त्यांना राग आल्याचे बोलले जात आहे.
सदर कथित ऑडिओ क्लिप ची पडताळणी झाल्यानंतर ग्रामसेवकावर कारवाई होणार हे आता पहायचे आहे.