तिने इन्स्टाग्रामवरुन केली मैत्री अन त्या अल्पवयीन मुलीसोबत नको ते घडलं….
अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी जातात सोशल मीडियामुळे अनेक चुकीच्या घटना घडतात अशीच एक धक्कादायक घटना घडली शाळकरी मुलगी सोशल मीडियावरती अनेक दिवसापासून ऍक्टिव्ह होते आणि त्यातूनच हा गुन्हा घडला सोशल मीडियाचा वापर हा जितका चांगला आहे तितकाच तो घातक आहे आपण याचा वापर कसा करतोय यावरती सगळं काही अवलंबून असतात सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे त्याचे घातक परिणाम होतात,धावपळीच्या जगात सोशल मीडियाने इतका धुमाकूळ घालून ठेवला आहे की इकडे तिकडे बघण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नाही.
इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुक हे लहानांपासून थोरांपर्यंत व्यक्त होण्याचे माध्यम झाले आहे. त्याचा वापर शाळकरी मुलांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याचा दुष्परिणाम इतका घातक होत आहे, की याचे सामाजिक भानच राहत नाही. लॉकडाऊननंतर अभ्यासासाठी मुलांच्या हातात आलेला मोबाईल हाच त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक कारकिर्दीला घातक ठरू पाहत आहशीच एक घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे सामाजिक भान विसरलो काय, हा प्रश्न आहे.जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलाने अल्पवयीनच मुलीवर अत्याचार केला. यामध्ये मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मुलावर पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलगा जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी आहे. त्याचे वय १५ असून तो शिक्षण घेत आहे. तर मुलगी ही साडेतेरा वर्षांची आहे. तीही जिल्ह्यातील रहिवासी आहे.
संबंधित मुलाने गोड बोलून मुलीवर अत्याचार केले. यामध्ये अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. यानंतर मुलीच्या नातेवाइकांकडून मुलाच्या विरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुल्ला हे तपास करीत आहेत.अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा खूपच धक्कादायक आहे. अगदी अंतर्मनाला पूर्णपणे हादरवून टाकणारी अशीच घटना आहे.
या घटनेची पार्श्वभूमीबद्दल जी माहिती ऐकली की सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून जी मैत्री झाली त्यातून हा निंदनीय प्रकार घडला आहे. खरे तर एवढ्या लहान वयात अशाप्रकारे विकसित झालेल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर ज्यांना त्याचा खरा अर्थ माहित नाही त्यांचे हाती ही साधने पडली की ती घातक शस्त्रे बनतात आणि मग अशा दुर्दैवी प्रकार घडतात.यामुळे अशा घटना नुसत्या ऐकून समाजाने दुर्लक्ष करण्यापेक्षा यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असं सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते भारत भोसले यांनी सांगितलं.