फेसबुक वर प्रेम झाले, १५ वर्षाचा मुलगा चक्क एवढ्या वयाच्या महिलेच्या प्रेमात पडला :
आजकाल सगळे जण डिजिटल होतात होत आहेत. यामध्ये सोशल मीडियाचा खूप मोठा हात आहे. आज काल सगळे डिजिटल झाल्यामुळे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. आणि सोशल मीडियाच्या खूप अति वापर देखील केलेले आपण सगळ्यांनी पाहिले आहे. एकमेकांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया जेवढे चांगले आहे त्याचप्रमाणे या सोशल मीडिया चे बरेच वाईट परिणाम देखील आहेत.
आपण जे सोशल मीडिया वापरतो त्याचा आपण कसा वापर करतो यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. जग हे खूप फास्ट झाला आहे त्याच प्रमाणे यामधील अपराध देखील त्याचप्रमाणे वाढत चालले आहेत. सोशल मीडियाचा वापर करून बऱ्याच वेळेस फसवणूक झाल्याचे आपण पाहिले आहे. पण ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे बिहार मधील जमुई जिल्ह्यातील एका गावातून हे प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियाचा म्हणजेच फेसबुकच्या चुकीच्या वापराने एक १५ वर्षाचा मुलगा ३५ वर्षाच्या दोन मुलांच्या आईच्या प्रेमात पडला. या दोघांमध्ये प्रेम एवढा वाढत गेलं की या महिलेने आपल्या पतीला हे खोटं सांगितलं की, हा मुलगा माझ्या माहेरकडील आहे असा बहाणा करून त्या महिलेने त्या मुलाला आपल्या घरातच थांबवून ठेवले. पण त्या रात्रीच्या अंधारात तिच्या पतीला हे दोघाजण नको त्या परिस्थितीमध्ये सापडले.
या गोष्टीचा राग येऊन त्या महिलेच्या पतीने त्या दोघांना गावातील मंदिराच्या समोर नेऊन जाहीरपणे दोघांनाही मारहाण केली. महिलेला व तिच्या १५ वर्षे प्रियकराला पती व ग्रामस्थांनी जी मारहाण केली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना जमुई जिल्ह्यातील नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहे. ही महिला फेसबुक मेसेंजर वर चॅट करत असताना दहावीचा विद्यार्थी असलेल्या पंधरा वर्षे मुलाच्या प्रेमात पडली. ही महिला मेसेंजर वापरून हे दोघ तासन्तास व्हिडिओ चॅट करत असायचे. आणि एक दिवस रविवारी ही महिला या मुलाला आपल्या घरी बोलावून घेते आणि हा मुलगा माझ्या माहेरचा रहिवासी आहे असे सांगून आपल्या घरातच राहायला लावते. पण त्या रात्री उशिरा या महिलेचे या मुलासोबत नको त्या परिस्थितीत दोघे महिलेच्या पतीला पाहायला मिळाले.
त्यानंतर या पद्धतीने राग येऊन गावातील मंदिरासमोर या दोघांनाही ग्रामस्थांच्या मदतीने मारहाण केली. आणि याचा व्हिडिओ व्हायरल केला या व्हिडिओमध्ये ती ३५ वर्षीय महिला आपल्या १५ वर्षीय प्रियकर मुलाला आपल्या कुशीत घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण तिचा नवरा या दोघांनाही लाठ्या काठ्या यांनी मारहाण करत आहे.या मारहाणीची बाब संपूर्ण गावात समोर येताच मुख्याधिकारी व घटनास्थळी पोहोचलेल्या स्थानिकांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटवण्यात आले आणि त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली. या डिजिटल च्या जगात आपण एकमेकांच्या जवळ नक्कीच आलो आहोत पण त्याचे हे अशे दुष्परुनाम देखील आजकाल आपल्या समोर येत आहे. फेसबुक वापरूर बर्याच विपरीत गोध्ती देखील घडलेल्या पण सगळ्यांनी पहिल्या आणि ऐकल्या आहेत. सोशल मिडिया चा वापर नक्की करा पण त्यापासून जपून राहणे हेच आपल्यासाठी चांगले आहे.